मुंबई : मुंबई क्राइम ब्रांचनं एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं.
मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला अशी महिती मिळाली होती की, 2020 मध्ये वेश्या व्यवसायात अटक केलेली एक महिला आपल्या पार्टनरसह मिळून एका वेगळ्या प्रकारे रॅकेट चालवत आहे. यानंतर मुंबई एअरपोर्टवर क्राईम ब्रांचच्या टीमनं ट्रॅप लावत दोन महिलांना अटक केलं आणि अन्य दोन महिला ज्यांना या व्यवसायात ढकललं जात होतं त्यांना ताब्यात घेत शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं आहे.
काय होती मोडस ऑपरेंडी?
ही लोकं ग्राहक शोधायची. त्यांना ग्राहक मिळला आणि डील फायनल झाली की, महिलांसोबत भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पोहोचवायचे. यात गोवा या लोकांची सर्वाधिक पसंती होती. संबंधित रॅकेट चालवणारे लोक ग्राहकांना आधी मुलींचे फोटो पाठवायचे. मुलगी पसंत आल्यानंतर ग्राहकांना गोवा किंवा ठरलेल्या ठिकाणापर्यंत फ्लाईटचं स्वत:चं तिकिट बुक करावं लागायचं. हे लोक ग्राहकांकडून दोन दिवसांचे 50 हजार रुपये घ्यायचे, जे एक्स्क्लुझिव्ह सेक्ससाठी घेतले जायचे. अटक केलेले आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घ्यायचे. ज्यानंतर ग्राहक त्यानं पसंत केलेल्या मुलीला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला जायचे आणि नंतर मुंबईत परतायचे.
कसं पकडलं रॅकेट
क्राइम ब्रांचनं या प्रकरणात दोन महिलांना अटक केलं आहे. यातील एकीचं नाव आबरुन अमजद खान उर्फ सारा तर दुसरीचं नाव वर्षा दयालाल असं आहे. क्राईम ब्रांचनं सांगितलं की, ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली त्यावेळी एक डुप्लिकेट ग्राहक तयार केला ज्यानं महिलांशी संपर्क केला आणि त्यांचा विश्वास जिंकण्यानंतर मुलींची मागणी केली. त्यानंतर गोव्याची तिकिटं देखील बुक केली. यानंतर ज्यावेळी त्या महिला एअरपोर्टवर पोहोचल्या त्यावेळी PSI स्वप्निल काळे आणि त्यांच्या टीमनं तीन महिलांना अडवलं आणि चौकशीनंतर ताब्यात घेतलं. चौकशीनंतर माहिती मिळाली की, यांची चौथी साथीदार असलेल्या महिलेनं बोर्डिंग पास घेतला आहे. त्यानंतर पीआय एम श्रीधनकर आणि पीआय प्रिया थोरात सीआयएसएफ यांच्या मदतीनं त्या महिलेला एअरपोर्टमधून बाहेर काढत ताब्यात घेतलं. त्यावेळी तिनं या प्रकरणाची कबुली दिली. त्या महिलेनं सांगितलं की, मुंबईत पोलिसांची छापेमारी खूप वाढली आहे. त्यामुळं मुलींना काम करायला भीती वाटते. त्यामुळं गोवा किंवा अन्य पर्यटनस्थळांवर फिरायला पाठवलं जायचं, जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये.