Mumbai Corona Updates: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज 757 नव्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, 280 जणांनी कोरोनावर मात केलीय. चिंताजनक बाब म्हणजे, मुंबई सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईत आज 757 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 70 हजार 190 वर पोहचली आहे. यापैकी 7 लाख 47 हजार 538 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर, आतापर्यंत 16 हजार 368 जणांचा मृत्यू झालाय. तर, शहरात 3 हजार 703 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट आता 97 टक्क्यांपर्यंत आलाय. महत्वाचं म्हणजे, मुंबईतील मृत्यूदर 0.5 टक्यांवर पोहचलाय.
एएनआयचं ट्वीट-
मुंबईत (24 डिसेंबर) शुक्रवारी 683 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. तर, एका जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. शुक्रवारी 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मुंबईत गुरुवारी 602 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. तर एका मृत्युची नोंद करण्यात आली होती. याशिवाय, 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मुंंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं प्रशासनाचे दाबे दणाणले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरादारी घेतली जातेय.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क, महाराष्ट्रासह दहा राज्यांत विशेष पथकं पाठवणार
- अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
- राज्यात नवे निर्बंध लागू! कोरोना वाढतोय; 'हे' नियम पाळावेच लागणार अन्यथा...
- लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची ब्ल्यू प्रिंट माझाच्या हाती, 250 केंद्रांवर विशेष सुविधा