Mumbai Coronavirus Cases : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मागील दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबईत 5,008 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईतील 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,008 रुग्णांपैकी 420 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,207 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत. 37 हजार 801 बेड्सपैकी केवळ 4,571 बेड वापरात आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के इतका आहे.