मुंबई : पोलादपुर नगपंचायतीमध्ये शिवसेने भगवा फडकला असून शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्वांनी आज युवासेना नेते वरून सरदेसाई यांच्या सोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळकट चालल्याचं पोलादपुर मध्ये दिसून आलं. कारण निवडून आलेले शिवसेनेचे 10 पैकी 4 नगरसेवक हे युवासेनेचे आहेत. 


पोलादपूर या ठिकाणी एकूण 17 जागा होत्या. त्यापैकी शिवसेना 10, कॉंग्रेस 6 आणि भाजपला केवळ 1 जागा मिळाली. एकनाथ शिंदे यांनी सगळ्या विजयी उमेदवारांची भेट घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


पोलादपूरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना रणसंग्राम चांगलाच शिगेला पोहोचला होता, मात्र शिवसेनेबरोबर काँग्रेसने देखील खांद्याला खांदा लावून याठिकाणी लढा दिला आणि आपले सहा नगरसेवक निवडून आणले. भाजपला मात्र त्यांचा एकच उमेदवार निवडून आणता आला.


पोलादपूरची निवडणूक महत्त्वाची होती कारण युवासेना या ठिकाणी पुढाकार घेऊन नगरपंचायतीच्या निवडणुकीत काम करत होती. दहापैकी चार उमेदवार हे युवा सेनेचे होते. त्यामुळे युवासेनेने सुद्धा आपली ताकद पोलादपूरच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिली.


युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विकास गोगावले यांनी पोलादपूर मधील नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी सांभाळली होती. सर्व विजयी उमेदवारांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha