मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यानंतर मुंबईसाठीही एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळं मुंबईत आतापर्यंत चौथ्यांदा आणि डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. या आधी 7 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे.


डिसेंबर महिन्यात याआधी 11 आणि 15 तारखांना शून्य मृत्यूची नोंद झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईला हा मोठा दिलासा मिळत आहे. मुंबईसाठी शून्य कोरोना मृत्यू हे आता हळूहळू सत्यात येणारे स्वप्न झाले आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 283 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 275 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97 टक्के इतकं झालं आहे. मुंबईत सध्या 1948 इतक्या संख्येने सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 2321 दिवसांचा झाला आहे. 


 




राज्याची स्थिती 
राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.


संबंधित बातम्या :