मुंबई : राज्यात शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 96 हजार 733 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 48 इतकी झाली आहे.
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 75 लाख 70 हजार 939 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 48 हजार 694 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे एकूण नमुण्यापैकी राज्यात 9.84 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 80,039 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशाची स्थिती
देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सुरुच असल्याचं पहायला मिळतंय. दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) संसर्गही वेगाने वाढत आहे. देशात गेल्या 24 तासात सात हजार 145 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर 289 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 113 वर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :