मुंबई : मुंबईत बुधवारी सायंकाळी 4 ते रात्री 10 च्या दरम्यान जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून 100 मीटर वाहून गेली. अग्निशमन दलानं एक ते दीड तास सर्च ऑपरेशन राबवून महिलेला नाल्यातून बाहेर काढलं. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारावेळी तिचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात सिप्झ कंपनीच्या समोर एक महिला काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना मेट्रोच्या कामासाठी खड्डा काढण्यात आला होता, त्या खड्ड्यावर झाकण टाकलं गेलं नव्हतं. त्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. एमएमआरडीएची बेपर्वाई यातून दिसून येते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळावर तात्काळ धाव घेऊन सर्च ऑपरेशन कार्य सुरू केले. उपचारासाठी कूपर रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आला मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. सिप्झ कंपनी समोर रस्त्यावर मेट्रो तीन लाईन साठी काम करण्यात आलं होता. काम केल्यानंतर हा रस्ता पालिकेकडे हॅन्ड ओव्हर करायचं होता. मात्र, मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभागाने मेट्रो तीन लाईनला पत्र लिहून संपूर्ण रस्त्याचा पहिल्या सारखं काम करून मग हँड ओव्हर करा, असा पत्र दिले होते.
सध्या ड्रेनेज लाईन वर मुंबई पोलिसांनी ढाकणं मागून मध्यरात्री ओपन ड्रेनेज झाकण लावून बंद केला आहे.विमला अनिल गायकवाड वय 45 वर्ष असं मृत महिलेचा नाव आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चूक नेमकी कोणाची आहे. कोणाच्या चुकीमुळे या महिलाचा बळी गेला आहे, या संदर्भात अधिक तपास करत आहेत. मेट्रो तीन लाईनचं 5 ऑक्टोबरला उद्घाटन आहे.मात्र या उद्घाटना आधी एमएमआरडीएच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. काल सायंकाळी सुरु झालेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. लोकलचे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं रेल्वे वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. आज देखील मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
इतर बातम्या :
Mumbai Rain VIDEO : आजही मुसळधार पाऊस पडणार, मुंबई आणि उपनगरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर