Mumbai Rains मुंबई: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पावसाने आज (21 जुलै) पहाटेपासूनच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना  दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतोय. 

Continues below advertisement


मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. साकीनाका मेट्रो परिसरातील रस्ते जलमय झालेत. वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागतेय. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील (Mumbai Local Trains Updates) फास्ट लोकल 10-12 मिनिटे उशिराने धावत आहे.


अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद-


मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.


पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी-


पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रे चे दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुज विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सखलभागात ठिकठिकाणी पाणी भरला आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.




संबंधित बातमी:


Mumbai Rain : मुंबई, ठाण्यासह पश्चिम उपनगरात धो-धो पावसाच्या सरी; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, राज्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?