म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5285 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात आलीये... या लॉटरीच्या माध्यमातून 5285 कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.. पण या लॉटरीसाठी अर्ज करताना किती अनामत रक्कम लागेल? याची माहिती आपण जाणून घेऊया...

Continues below advertisement

5285 घरे आणि 77 भूखंड कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत. त्यात ठाणे, कल्याण डोंबिवली, टिटवाळा, नवी मुंबई, मिरा रोड, पालघर आणि विरार या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. पण लॉटरीसाठी अर्ज भरताना किती अनामत रक्कम भरावी लागेल असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

म्हाडा लॉटरीसाठी उत्पन्न मर्यादा

Continues below advertisement

  • उत्पन्न गट - अत्यल्प उत्पन्न गट (EWS)
  • उत्पन्न मर्यादा (वार्षिक) - 6,00,000 रुपयांपर्यंत
  • उत्पन्न गट - अल्प उत्पन्न गट (LIG)
  • उत्पन्न मर्यादा (वार्षिक) - 9,00,000 रुपयांपर्यंत
  • उत्पन्न गट - मध्यम उत्पन्न गट (MIG)
  • उत्पन्न मर्यादा (वार्षिक) - 12,00,000 रुपयांपर्यंत
  • उत्पन्न गट - उच्च उत्पन्न गट (HIG)
  • उत्पन्न मर्यादा (वार्षिक) - कमाल मर्यादा नाही

अर्जासोबत अनामत रक्कम किती भरावी लागणार?

  • अल्प उत्पन्न गटअनामत रक्कम -10590 रुपये
  • अत्यल्प उत्पन्न गटअनामत रक्कम - 5590 रुपये
  • मध्यम उत्पन्न गटअनामत रक्कम - 15590 रुपये
  • उच्च उत्पन्न गटअनामत रक्कम - 20590 रुपये
  • अर्ज कसा करायचा?

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा.

कोणती कागदपत्र लागतील? 

  • आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
  • पॅन कार्ड
  • रहिवासी व अधिवास प्रमाणपत्र
  • कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
  • आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र

विशेष प्रवर्गासाठी म्हणजे कलाकार, पत्रकार, सरकारी कर्मचारी, माजी सैनिक, आमदार खासदार, यांच्यासाठी स्वतंत्र प्रमाणपत्र लागतील. वेबसाईटवर नमुने उपलब्ध आहेत.