Mumbai Rains Local Train: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे 24 तास धावणारे शहर असा लौकिक असणाऱ्या मुंबईचा (Mumbai News) वेग पूर्णपणे मंदावला आहे. रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पहाटेपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे (Heavy Rain) आज सकाळी कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसाने थोडीही उसंत न दिल्याने मुंबईची लाईफलाईन असणारी उपनगरीय लोकल ट्रेन सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

Continues below advertisement


सध्या मध्य रेल्वेमार्गावरील ट्रेन 25 ते 30 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला, माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तर चुनाभट्टी, चेंबूर आणि टिळकनगर या स्थानकांच्या परिसरात पाणी साचल्याने हार्बर रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील ट्रेन 12 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ट्रेन 10 मिनिटे उशीरा धावत आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील बऱ्यापैकी सुरळीत सुरु आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि रेल्वे स्थानकांमध्ये पाणी साचल्यास मुंबईची लाईफलाईन ठप्प होऊ शकते. 


याशिवाय, दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ, किंग्ज सर्कल या सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. तर पश्चिम उपनगरात अंधेरी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


Mumbai News: गरज असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाकडून मुंबईकरांना सूचना


हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणात रेड अलर्ट असेल. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून, गरज असल्यास घराबाहेर पडा, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.


Thane Rain news: ठाण्यात चार तासांमध्ये 31.22 मिमी पाऊस


ठाण्यात अवघ्या चार तासात 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी 11 ते 12.30 दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला आहे. तर यंदाच्यावर्षी ठाण्यात 1 हजार 947 मिमी पाऊस पडला आहे. ठाण्यात वंदना डेपोसह अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. 



आणखी वाचा


गो अराउंड, गो अराउंड..., मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली, नेमकं काय घडलं?


चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसर पाण्याखाली; इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत भरले पाणी


मुंबई आणि ठाण्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे