Mumbai Rains मुंबई: पुढील 48 तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला पावसाचा (Mumbai Rain) रेड अलर्ट जारी (Mumbai Red Alert Rain News) करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट आहे. तर पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चेंबूरची पोस्टल कॉलनी परिसर पाण्याखाली-

मुंबई शहरासह उपनगरात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यामुळे चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसर पाण्याखाली गेले आहे. सुमारे पाच फूट पाणी या विभागात भरल्याने इथली घरे रिकामी करण्यात आली आहे. इमारतीच्या पाहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरले आहे. मुंबईमधील उच्चभ्रू समजली जाणारी ही वसाहत पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. 

मुंबईतील शाळेला सुटी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन-

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (18 ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा-

कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानूसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे. मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.

संबंधित बातमी:

Maharashtra Live Blog Updates: मुंबई, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, पुढील 48 तास महत्त्वाचे