Mumbai Rain :  मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळी वाऱ्याने आणि त्यानंतर आलेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. मुंबईमध्ये आज (13 मे) दुपारच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली. ताशी शंभरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीसह विमान वाहतुकीवर सुद्धा विपरित परिणाम झाला. 






मुलुंड- ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळून मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घाटकोपरमध्ये आझाद बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपवर मोठी होर्डिंग्ज कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत माहिती समोर आली नसली, तरी पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळल्याने अनेकजण दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 






आतापर्यंत मुंबईत काय काय घडलं?



  • वडाळा पूर्व या ठिकाणी असलेल्या श्रीजी टॉवर्सचे पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलं.

  • या पार्किंग स्ट्रक्चरमध्ये कोणी अडकलं आहे का? याबाबत अपडेट समोर आलेली नाही. 

  • मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक पुन्हा सुरु 

  • अनेक विमाने अन्य विमानतळांकडे वळवळी

  • पूर्व दृतगती मार्गांवर सायन परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक

  • मुंबईत पडलेल्या पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम. 

  • मुंबईत पाऊस पडल्याने रस्ते वाहतूक संथ गतीने

  • जोराचा वारा आणि पडलेल्या पावसामुळे भायखळा लालबाग ब्रिजवर अपघात

  • टेम्पो आणि टोविंग व्हॅन एकमेकांना धडकल्या

  • टेम्पो चालकाला गाडीचा अंदाज न आल्याने अपघात

  • होर्डिंग्ज कोसळलेल्या पेट्रोल पंपखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले 

  • गॅस कटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु 

  • गेल्या तीन तासांपासून कल्याण डोंबिवलीमधील वीजपुरवठा खंडित

  • कल्याण ,टिटवाळा,डोंबिवली मध्ये वीज खंडित


इतर महत्वाच्या बातम्या