मुंबई : एकीकडे मुसळधार पावसानं तुंबलेलं पाणी आणि दुर्घटनांनी दैना उडाली असली तरी मुसळधार पावसाचा सकारात्मक परिणाम तलाव आणि धरणक्षेत्रात दिसून येत आहे.  गेल्या 24 तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. दोन दिवसाच्या मुसळधार पावसात 129 दिवसाचा म्हणजे सव्वाचार महिन्यांचा पाणीसाठा वाढला आहे तर एका दिवसातच 65 दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.


काल दिवसा आणि रात्रभरात कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर 247834 दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला. आज मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  तलावांमध्ये 779568 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालं आहे.


Mumbai Rains LIVE : मुंबईसह राज्यभरातील पावसाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...


मुंबई महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख 7 तलावांपैकी तानसा तलाव गुरुवारी, 2 जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ मोडक सागर धरणही भरून वाहू लागले. त्यामुळे मोठ्या तलाव व धरणांपैकी तानसा व मोडक सागर भरून वाहू लागल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची निम्मी चिंता मिटली.


हा तलाव गेल्यावर्षी 20 ऑगस्ट 2020 रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या 2019 मध्ये हा तलाव 25 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधी वर्ष 2018 मध्‍ये 17 जुलै रोजी, वर्ष 2017 मध्‍ये 18 जुलै रोजी तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच सन 2016 मध्‍ये हा तलाव 2 ऑगस्‍ट रोजी भरुन वाहू लागला होता.


 Mumbai Maharashtra Rain : पावसाचं रौद्ररुप! राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, घरं पाण्यात, पुढील पाच दिवस सावध राहा...


काल रात्रीच्या मुसळधार पावसात तानसा आणि मोडक सागर ही धरणे भरली. यापूर्वी विहार आणि तुळशी तलावही ओव्हहरफ्लो झाले. आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी 7 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आता भातसा आणि मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लीटर आहे. यापूर्वी तुळसी तलाव 16 जुलै रोजी भरले होते, तर विहार तलाव दुसऱ्याच दिवशी भरले होते. त्यानंतर मोठ्या तलावांपैकी तानसा तलाव भरल्याने आता प्रतीक्षा होती ती मोडक सागर धरणाची. पण तेही गुरुवारी सकाळी भरले. मोडक सागर तलावही सकाळी भरून वाहू लागले, या धरणाचे दोन गेट सकाळी उघडण्यात आले.