Maharashtra Rains LIVE : मुंबईसह राज्यभरातील पावसाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Mumbai Maharashtra Rain LIVE Update : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2021 06:50 AM
पुढच्या पाच दिवसात राज्यात पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे

दीड महिन्याच्या कालावधीत राज्यातील धरणांत 47 टक्के पाणीसाठा

राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. 13 जून ते 26 जुलै या दीड महिन्यात 373 टीएमसी पाण्याची धरणात नव्याने आवक झाली आहे. सध्या एकूण 3 हजार 267 प्रकल्पामध्ये सुमारे 680 टीएमसी म्हणजेच 47 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी 39 टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध होता.

दिलासादायक, कृष्णेची पातळी 5 फुटाने ओसरली, तर सांगली जिल्ह्याला तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा

सांगली : सांगलीकरासाठी 2 दिलासादायक बातम्या. कृष्णेची पातळी 5 फुटाने ओसरली तर जिल्ह्याला तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. आयर्विन पुलाजवळ 55 फुटांवरून आता पाणी  पातळी 50 फुटापर्यंत ओसरली आहे. सांगली जिल्ह्याला रात्री तब्बल 65 हजार कोरोना लसीचा पुरवठा, जिल्ह्याला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर, नागरिकांची झालेली गर्दी आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पूर पट्ट्यातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्यासाठी तयारी सुरु

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्यासाठी तयारी सुरु  झाली आहे. पुरस्थित किती आर्थिक नुकसान झालंय, याचा आढावा घ्या असे
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश दिले आहे. येणा-या कॅबिनेटमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक अहवाल समोर ठेवला जाईल.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, अर्थखात्येच सचिव व अधिकारी यांच्यात उद्या बैठक होणार आहे. अनेक घरांसह व्यापा-यांनाही मदत करणार असल्याची माहिती आली आहे.  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत करण्याची सरकार सज्ज आहेय 


मुख्यमंत्र्यांनी काय काय दिले आदेश :- 


रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा तातडीनं सुरु करा 


आरोग्य विभागानं जंतुनाशक फवारणी, लोकांना लसीकरण, गोळ्या औषधं पुरवावी


पीण्याच्या पाण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी टॅंकरन पाणी पुरवावं

ज्या कुटुंबाच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

ज्या कुटुंबाच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजारांची मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

भुईबावडा घाट पुढील सहा महिने वाहतुकीसाठी बंद राहणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती 

भुईबावडा घाटात रस्त्यावर उभी भेग गेल्यामुळे पुढील सहा महिने ते एक वर्ष वाहतुकीसाठी हा घाट बंद राहणार आहे. दुरुस्त करायचा म्हटलं तरी सहा महिने जातील त्यामुळे सध्या भुईबावडा घाट पुढील सहा महिने तरी बंद राहणार  आहे.
करूळ घाट दरड कोसळून घाट खचलेला होता त्यामुळे त्या घाटातून पाच ते सहा दिवसात करूळ घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल मात्र भुईबावडा घाट पुढील सहा महिने वाहतुकीसाठी बंद राहणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती 

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर आहे. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचे कौतुक  केले. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला
आहे. तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला. राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी ठाकरे सरकारची बैठक सुरु

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी ठाकरे सरकारची बैठक सुरु झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पदरात काय पडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सचिव वर्षा बंगल्यावर उपस्थित आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर 100 कोटी आणि तोक्ते वादळानंतर 250 कोटींची मदत जाहीर   केली होती. नुकसानग्रस्त कुटुंबियांसह पूरग्रस्त व्यापा-यांना मदत देण्याचा सरकारचा मानस आहे. 
चिपळुण महाडच्या व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. पूर्ण घर कोसळलेल्या, नुसती पडझड झालेल्या घरांना ठाकरे सरकार मदत करणार आहे.

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार  महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमीनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी बांधणार संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. 


 

तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा, गृहनिर्माण खात्यानं बोलावली तातडीची बैठक

तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहनिर्माण खात्यानं बोलावली तातडीची बैठक बोलवली असून तळीये गावच्या पुर्नविकासासाठी रायगड ट्रस्ट देणार चार एकर जमिन  देण्यात येणार आगे.  छत्रपती संभाजीराजेंनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना फोन केला. 
तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करणार, यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.म्हाडाचे अभियंते आणि मंत्री तळीये गावात जाऊन करणार पाहणी करणार आहे. 

राष्ट्रवादीच्या आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार : अजित पवार

राष्ट्रवादीच्या आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. सांगलीचा हा पूर मनुष्यनिर्मित नाही. कोयनेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यात आले होते. राज्य आपत्ती निवारण दलाची एक टीम कराडला ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. यासोबतचं रायगड आणि रत्नागिरी भागात देखील ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर पोहोचले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर पोहोचले. दौरा रद्द करून ते मुंबईला निघाले. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची एबीपी माझाला माहिती.

वातावरण खराब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द

Maharashtra Rains LIVE : वातावरण खराब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, कोयनानगरच्या परिसरात ढगाळ वातावरण असल्यानं मुख्यमंत्री पुण्याला रवाना 

उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी, भिलवडी परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधला

उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली

सांगली: कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली, दोन फुटांनी पातळी ओसरली

सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली आहे.. दोन फुटांनी पातळी ओसरली आहे.. 55 वरून 53 फुटावर गेली आहे.. त्यामुळे सांगलीच्या गणपती पेठ, सराफ कट्टा येथील पाणी ओसरत आहे.. तर महापालिकेकडून स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि स्वच्छता करण्यात येत आहे.. 

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्यातून भगदाड , वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्यातून भगदाड ,


वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका ,


निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वासनोली धरण बहुचर्चित ,


सांडव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

भुदरगडकडे जाणारा घाटरस्ता गडबिद्री गावापासून पुढे खचला, परिसरात व रस्त्यानजीक कोणीही फिरू नये, पोलिसांचं आवाहन

कोल्हापूर- भुदरगड पोलिस ठाणे  हद्दीमधील किल्ले भुदरगडकडे जाणारा घाटरस्ता गडबिद्री गावापासून पुढे खचला आहे...जमिनीला मोठमोठ्या लांबलचक भेगा पडलेल्या आहेत. रस्त्यावर दरडी कोसळलेल्या आहेत...लँड स्लाईड होण्याची शक्यता आहे. तरी आसपासच्या परिसरात व रस्त्यानजीक कोणीही फिरू नये, पोलिसांचं आवाहन

पुरामुळे सांगली, कुपवाडचा पाणी पुरवठा तीन दिवस बंद राहणार..महापालिका टँकरने पाणीपुरवठा करणार

महापुरात  महापालिकेचे पाणी उपसा केंद्र बुडाल्याने सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना होणारा पाणीपुरवठा पुढचे तीन दिवस ठप्प राहणार आहे. या काळात महापालिकेच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून यासाठी टँकर सुरू आहेत. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे महापालिकेचे पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. सध्या नदीची पाणीपातळी जास्त आहे. हे पाणी ओसरले शिवाय पाणी उपसा केंद्राजवळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जाता येत नसल्यामुळे सांगली आणि कुपवाड या दोन शहरांना पाणीपुरवठा बंद झाला आहे.

मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 26 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची  पाहणी करतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. 

सातारा : मिरगाव येथील भुस्खलनात आज दोन मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश

सातारा : मिरगाव येथील भुस्खलनात आज दोन मृतदेह बाहेर काढण्यात NDRF टीमला यश मिळाले. उद्या पुन्हा सकाळी 8 वाजता NDRF टीम मिरगावात पोहचेल.

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे 3, 4, 5, 6 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून 6912क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे 3, 4, 5, 6 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून 6912क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांमधे मुसळधार पावसाने तब्बल 37 जणांचा बळी

सातारा जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांमधे मुसळधार पावसाने तब्बल 37 जणांचा बळी घेतलाय.  यातील 26 मृत्यु भुस्खलनामुळे झालेत, आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मरण पावलेत तर दोघांचा दरड कोसळून मृत्यु झालाय तर एक व्यक्ती छत कोसळून मरण पावलाय. तर जिल्ह्यातील पाच नागरिक अजुनही बेपत्ता आहेत.

सांगली, कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 11 वाजल्यापासून 54.5 फुटांवर स्थिर, सांगलीतील पूरस्थिती कायम

सांगली, कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 11 वाजल्यापासून 54.5 फुटांवर स्थिर, सांगलीतील पूरस्थिती कायम

सातारा जिल्ह्यातील आंबेघरमधील बचावकार्य थांबवण्यात आलं

सातारा जिल्ह्यातील आंबेघर मधील बचावकार्य थांबवण्यात आलं.  आंबेघरमधील घरांवर दरड कोसळून गावातील पंधरा व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या .काल अकरा जणांचे मृतदेह मिळाले होते तर आज आणखी तिघांचे मृतदेह काढण्यात यश आलं. मात्र दहा महिन्यांच्या हर्षदा धोंडीराम कोळेकर या मुलीचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही.  रवीवारी बारा वाजल्यापासून पोकलेन मशीनच्या साहाय्याने एन डी आर एफ आणि प्रशासकीय यंत्रणा हर्षदाचा शोध घेत होत्या.  परंतू राडा रोड्यासह ती वाहून गेली असावी अशी शक्यता गृहीत धरून तीच्या कुटुंबीयांच्या संमतीने संध्याकाळी बचावकार्य थांबवण्यात आलयं.  आंबेघरच्या या दुर्घटनेत एकुण चौदाजणांचे मृतदेह मिळाले मात्र दहा वर्षांच्या हर्षदाचा शेवटपर्यंत पत्ता लागू शकला नाही.

कोल्हापूरमधील राधानगरी धरण शंभर टक्के भरले, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे चार वाजता उघडले

कोल्हापूरमधील राधानगरी धरण शंभर टक्के भरले, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे चार वाजता उघडले, 3 नंबर आणि 6 नंबरच्या दरवाजामधून पाण्याचा विसर्ग, दोन्ही दरवाजांमधून एकूण 4236 क्यूसेक्स पाणी भोगावती नदीपात्रात

सांगलीकर आणि कृष्णा नदी काठासाठी  दिलासादायक बातमी

सांगलीकर आणि कृष्णा नदी काठासाठी  दिलासादायक बातमी,


सकाळी 11 वाजेपासून आतापर्यंत पाणी पातळी 54.5 फुटांवर स्थिर राहू लागली,


आयर्विन पूलाजवळ सकाळी 11 वाजेपासून ते आतापर्यंत  54.5 फुटांवर पाणी पातळी स्थिर राहिली,


संध्याकाळपर्यंत पाणी पातळी स्थिर राहून संथ गतीने उतरेल अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची माहिती

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल

अजित पवार आज सातारा येथे येतील रात्री मुक्कामासाठी.  उद्या सकाळी ते सातारहून आधी कोल्हापुरात जातील आणि कोल्हापुरमधुन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल.  कोल्हापुरमधुन ते सांगलीत जाऊन सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील आणि शेवटी सातारला येऊन सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतील.

मुख्यमंत्री यांचे चिपळूण येथे आगमन, चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा

मुख्यमंत्री यांचे चिपळूण येथे आगमन, चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा, बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते, चिपळूण येथील हॉटेल अभिषेक मध्ये आढावा बैठक घेणार, जिल्हाधिकारी यांच्या सह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतरा पाण्यात बुडाला

सांगलीतील मारुती चौक परिसरातील असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतरा पाण्यात बुडाला आहे. तसेच मारुती चौक परिसरातील सर्व दुकाने पाण्याखाली गेलेत. 

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 300 हून अधिक कैदी अडकले

सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 300 हून अधिक कैदी अडकले,


पाणी पातळीत वाढ झाल्याने राजवाडा चौकातील मध्यवर्ती जेल मध्ये घुसले पाणी,


जेल परिसरात 6 फूट पाणी,


जेलचे अधीक्षक स्वतः अडकले पाण्यात ; मदतीसाठी प्रशासनाकडे विनवणी करूनही अद्याप मदत नाही ,


सध्या जेल मध्ये 50हुन अधिक महिला कैदी आहेत

सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी कमी करण्यासाठी वारणा धरणातील विसर्ग कमी केला

सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी कमी करण्यासाठी वारणा धरणातील विसर्ग कमी केला. कृष्णा-वारणा नदीचा संगम असलेल्या हरिपूर संगमावर वारणा नदीचा वेग अधिक असल्याने कृष्णा नदीतून पाणी उतरण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे पाऊस कमी होऊन सुद्धा सांगलीत पाणी पातळी अजून कमी होत नाही आहे. वारणा धरणातून 14630 क्युसेक्स चालू असलेला विसर्ग कमी करुन 8720 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. 

अर्धी सांगली आणि सांगली महापालिकेच्या आयुक्तांचे निवासस्थानही पुराच्या पाण्यात

सांगली-: अर्धी सांगली आणि सांगली महापालिकेच्या आयुक्तांचे निवासस्थान ही पुराच्या पाण्यात,


सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानाला पुराच्या पाण्याचा वेढा,


2019 च्या पुराचाही आयुक्तांच्या बंगल्याला बसला होता फटका..त्यानंतर बंगल्याची मोठ्या प्रमाणावर केली होती डागडुजी,


नदीतील  पाणी उपसा स्टेशन पाण्याखाली गेल्याने ,


शहरातील विश्रांमबाग, कुपवाड या भागात पाणीटंचाई, दुधाची देखील काही प्रमाणात टंचाई,


शहरातील विश्रांमबाग, कुपवाड, मिरजच्या काही भागात नदी काठचे बहुतांश लोक झालेत स्थलांतरित

सांगलीकर आणि कृष्णा नदी काठची धाकधूक आणखी वाढली कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत

सांगलीकर आणि कृष्णा नदी काठची धाकधूक आणखी वाढली  कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत,


2005 सालची 53 फुटांची महापुराची पातळी नदीने रात्री ओलांडली,


52 फुटापर्यंत पाणी पातळी गेल्यानंतर पातळी स्थिर होईल हा पाटबंधारे विभागाचा अंदाजही ठरला फोल,


आता 54 फुटांवर पाणी पातळी स्थिर राहणार, आणखी पातळी वाढणार की पातळी कमी होणार ,

शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली

शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये पेट्रोल पंपावर दरड कोसळली, पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली गायब झाला

पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल, एकूण 112 मृत्यू झाले असून 3221 जनावरांचे मृत्यू

पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल, मदत व पुनर्वसन विभागाने आज रात्री 9.30 वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे  हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण 112 मृत्यू झाले असून 3221 जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर 53 लोक जखमी असून 99 लोक बेपत्ता आहेत. 1,35,313 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे

सातारा : मिरगाव भुस्खलनातील सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश

सातारा : मिरगाव भुस्खलनातील सहा मृतदेह बाहेर काढण्यात यश, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीला यश, पाणी ओसरल्यामुळे पोकलेन गावापर्यंत नेण्यात यश

रायगड : महाड तालुक्यातील तळीये येथील दरडीतील मृतांची संख्या 42 वर

रायगड : महाड तालुक्यातील तळीये येथील दरडीतील मृतांची संख्या 42 वर, तर पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे 6 जणांचा मृत्यू, केवनाले येथील मृतांची संख्या 5 वर

महाड तालुक्यातील तळीये येथील दरडीतील मृतांची संख्या 42

महाड तालुक्यातील तळीये येथील दरडीतील मृतांची संख्या 42 झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील  सुतारवाडी येथे 6 मृत, केवनाले येथील मृतांची संख्या 5 झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा, 11.30 वाजता चिपळूणमध्ये मुख्यमंत्री येणार, चिपळूणनंतर जाणार साताऱ्याला

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे 7541 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे 7541 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाला पाठवली नुकसानीची प्राथमिक माहिती

तळीयेचं पुनर्वसन म्हाडा करणार : जितेंद्र आव्हाड

दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावाचं पुनर्वसन म्हाडामार्फत करण्याची जितेंद्र आव्हाड यांची घोषणा, मुख्यमंत्री महोदयांनी तळीये वासियांना जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही, ती पूर्ण करायला ही सुरुवात असल्याच्या आशयाचा गृहनिर्माण मंत्र्यांकडून ट्वीट.. तळीयेचं पुनर्वसन करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचीही ट्वीट द्वारे माहिती  

आतापर्यंत 82 जणांना मृत्यू तर 59 जण बेपत्ता, छगन भुजबळ यांची माहिती

सातारा आणि रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट दिला आहे,  नेव्ही 7, आर्मी 3, कोस्ट गार्ड 4,  NDRF च्या एकूण 34 टीम बचावकार्य करतायेत, 90604 नागरिकांना सुरक्षित, आतापर्यंत 82 जणांना मृत्यू तर 59 जण बेपत्ता, छगन भुजबळ यांची माहिती

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघरमधे झालेल्या भुस्खलनानंतर आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढले, आणखी सहा जणांचा शोध सुरु

  • सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघरमधे झालेल्या भुस्खलनानंतर आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत तर आणखी सहा जणांचा शोध घेणं सुरु आहे.

  • पाटण तालुक्यातील मीरगाव मधे दहा ते अकरा व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या असाव्यात अशी भीती प्रशासनाने व्यक्त केलीय . मात्र या ठिकाणी संपर्क होऊ शकत नसल्याने अजून बचावकार्याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

  • पाटण तालुक्यातील कोंढावळे गावातही काही व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या असाव्यात अशी शक्यता आहे.  मात्र नक्की किती व्यक्ती बेपत्ता आहेत याची माहिती प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध नाही.

यवतमाळमधील पूस धरण ओव्हरफ्लो, 13 दिवसात पुस धरणाचा जलसाठा 62 टक्क्याने वाढला

यवतमाळमधील पूस धरण ओव्हरफ्लो. पुसद शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण आज ओव्हरफ्लो झाले. तेच काठोकाठ भरलेले धरण पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मागील 13 दिवसात पुस धरणाचा जलसाठा 62 टक्क्याने वाढला आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत 471 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने पूस नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव आज सकाळी फुटला

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथील पाझर तलाव आज सकाळी फुटला. या पाझर तलावातील सगळे पाणी आजुबाजुच्या शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदगीर तालुक्यात सतत चार दिवसांपासून पाऊस सुरू होता. या पावसाने तालुक्यातील सर्वच तळे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. आज सकाळी डोंगरशेळकी येथील पाझर तलाव भरून वाहत होते. त्यातच मातीचा भराव टाकून अडवलेले पाणी अतिरिक्त झाले आणि पाझर तलाव फुटला. 

गडचिरोली जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

जळगाव जिल्ह्यात सध्या पाऊस कमी असला तरी तापी नदीला मोठा पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले
जळगाव जिल्ह्यात सध्या पाऊस कमी असला तरी तापी नदीला मोठा पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

जळगावात सध्या पाऊस नसला तरी विधरब आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्याचा परिणाम म्हणून तापी आणि पुरणा नदीला मोठा पूर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या हतनूर धरनात पाण्याची मोठी आवक वाढल्याने या धरणाचं सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. 
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार 

तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. 


 

पुढील 24 तासात महाराष्ट्रातला पावसाचा जोर ओसरणार, मात्र आज पश्चिम किनारपट्टीसह घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज


पुढील 24 तासात महाराष्ट्रातला पावसाचा जोर ओसरणार, मात्र आज पश्चिम किनारपट्टीसह घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, जोरमध्ये मागील २४ तासात सकाळी ८:३० पर्यंत ४३३ मिमी पावसाची नोंद


रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी अतिमुसळधार, आजसाठी तिन्ही जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट, घाट माथ्यावर ७०-२०० मिमीपर्यंत पावसाची शक्यता, उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होणार


महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊन, उत्तर भारतात पावसाचे प्रमाण वाढणार 


आज मुंबईतील वातावरण सामान्य, मात्र, वातावरणात उष्णता  असल्याने संध्याकाळनंतर पावसाची शक्यता व्यक्त 


संध्याकाळनंतर अधूनमधून मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी 


नाशिकमधील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, शहरी भागात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित


मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, त्यानंतर वातावरण सामान्य राहणार 


विदर्भात पुढील २-३ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज, आज सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज, आज काही ठिकाणी मुसळधारेची शक्यता

तळीयेमध्ये आतापर्यंत 42 मृतदेह हाती, गावातील 40 जण अद्यापही बेपत्ता, मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात पोहोचले

तळीयेमध्ये आतापर्यंत 42 मृतदेह हाती, गावातील 40 जण अद्यापही बेपत्ता, मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात पोहोचले

सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत

Monsoon Update : सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत काढले आहेत. कोल्हापुरात आज सकाळी 8:30 पर्यंत 181 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक 2005 साली बघायला मिळाला होता. ज्यात 26 जुलै 2005 साली 174.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तिकडे साताऱ्यात देखील सकाळी 8:30 पर्यंत 172 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी 7 जुलै 1977 साली 129.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 


2019 साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी 55.6 फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी 56.3 फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.

सातारा आणि कोल्हापुरात मागील 24 तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत 

सातारा आणि कोल्हापुरात मागील २४ तासात पावसाचे जुलै महिन्यातले सर्व रेकाॅर्ड मोडीत 


कोल्हापुरात आज सकाळी ८:३० पर्यंत १८१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाचा उच्चांक २००५ साली बघायला मिळाला होता. ज्यात २६ जुलै २००५ साली १७४.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. 


तिकडे साताऱ्यात देखील सकाळी ८:३० पर्यंत १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ह्या आधी ७ जुलै १९७७ साली १२९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 


२०१९ साली कोल्हापूर महापुरावेळी पंचगंगेची पातळी ५५.६ फुटांपर्यंत गेली होती. तर आता घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे हीच पातळी ५६.३ फुटांपर्यंत गेली होती. कमी वेळात अधिकचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती बघायला मिळत आहे. मात्र, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्याची पातळी कमी देखील होते आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडचा दौरा करणार

BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडचा दौरा करणार ; दुपारी 12 वाजता मुंबईतून हेलिकॉप्टरने रवाना होणार, दरड दुर्घटनाग्रस्त तळीये गावात पाहणी करणार

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल रस्त्यावर डोंगर खचल्याने एक युवक अडकल्याची भीती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल रस्त्यावर डोंगर खचल्याने एक युवक अडकल्याची भीती, 


वेंगुर्लातील युवक छुप्या मार्गाने गोव्याला कामाला जाताना गाळेल गावात डोंगर कोसळल्याने युवक अडकला,


स्थानिकांनी त्याठिकाणी दुचाकी स्वार अडकल्याची भीती,


त्या युवकांची मित्रमंडळी घटनास्थळी पोकलेन मशीन घेऊन दाखल होत शोधकार्य सुरू,


NDRF ची टीम घटनास्थळी दाखल होणार,


जिल्ह्यात दोन NDRF टीम आले असून सावंतवाडी व दोडामार्ग मध्ये दाखल,

अकोला जिल्ह्यात पावसामुळे 34 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान

अकोला : जिल्ह्यात पावसामुळे 34 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याची जिल्हा प्रशासनाची आकडेवारी. 334 जनावरांसह 39 कुक्कुट पक्षांचा मृत्यू. 


तालुकानिहाय शेतीचे नुकसान हेक्टरमध्ये :


अकोला    : 19079
बार्शीटाकळी : 1850
अकोट : 150
तेल्हारा : 300
बाळापूर : 12246
मुर्तिजापूर : 173

बेळगाव जिल्ह्यातील खानापूरमध्ये  गेल्या 24 तासात 541 मि.मी पावसाची नोंद

बेळगाव जिल्ह्यातील खानापूरमध्ये  गेल्या 24 तासात 541 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 


पावसामुळे 12 गावांचा संपर्क तुटला असून 21 पुल पाण्याखाली गेले आहेत. तर 50हून अधिक घरं पडली आहेत. 


खानापूर या मतदारसंघाच्या आमदार अंजली निंबाळकर यांचं घर देखील पाण्यात गेलं आहे.

वशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरू, चिपळूण आणि कामठे स्टेशन दरम्यानची वाहतूक परवा पासून होती बंद

वशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरू, चिपळूण आणि कामठे स्टेशन दरम्यानची वाहतूक परवा पासून होती बंद, 


त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या होत्या, तर मुंबई आणि गोवा इथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, 


आज सकाळी पावणे चारला ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर कोकण रेल्वे पुन्हा सुरू

वाशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरु

 वाशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्याने कोकण रेल्वे पुन्हा सुरु करण्यात आली आहे. वाशिष्ठीच्या पुरामुळे चिपळूण आणि कामठे स्टेशन दरम्यानची वाहतूक परवापासून बंद होती. त्यामुळे अनेक गाड्या रखडल्या होत्या, तर मुंबई आणि गोवा इथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आज सकाळी पावणे चारला ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर कोकण रेल्वे पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अद्यापही पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच, आज सकाळी 8 वाजता धरणातून एकूण 2 लाख 74 हजार 807 क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून अद्यापही पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच, आज सकाळी 8 वाजता धरणातून एकूण 2 लाख 74 हजार 807 क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू, 


पॉवरहाऊस माध्यमातून 42 हजार 500 क्यूसेक तर गेटमधून 2 लाख 31 हजार 248 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू

महाडमधल्या तळीये गावात 40 तास उलटून गेल्यानंतर अजूनही 44 जण बेपत्ता

अतिवृष्टीमुळे सर्वात मोठी भूस्खलनाची दुर्घटना घडलेल्या महाडमधल्या तळीये गावात ४० तास उलटून गेल्यानंतर अजूनही ४४ जण बेपत्ता आहेत. काल संध्याकाळपर्यंत ३८ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. दुर्गम भागातल्या तळीयेमध्ये एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी तळीये गावात डोंगर ३२ घरांवर कोसळला. त्यानंतर आता तिसरा दिवस उजाडला तरी ४० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. 

सातारा जिल्ह्यातील तारळी नदीला महापूर, पुराचे पाणी खंडोबाची पाली मंदिरात, मंदिरा बरोबर परिसरातील रस्तेही पाण्याखाली

सातारा जिल्ह्यातील तारळी नदीला महापूर, पुराचे पाणी खंडोबाची पाली मंदिरात, मंदिरा बरोबर परिसरातील रस्तेही पाण्याखाली, मंदिर परिसरातील सर्व घरातील लोकांचे केले स्थलांतर

कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी, पंचगंगेची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात

कोल्हापूरकर पंचगंगेच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहेत.. कारण पंचगंगेनं कालच धोक्याची पातळी ओलांडली होती. सध्या पंचगंगेची पातळी 56 फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्यानं पंचगंगेची पातळी स्थिर आहे. तसंच अलमपट्टी धरणातून कालपासून 3 लाख क्युसेक गतीनं विसर्ग सुरु आहे. धरणाचे सर्व  म्हणजे २६ दरवाजे उघडण्यात आल्यानं कोल्हापूर आणि सांगलीतल्या नद्यांची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे.. 

पाटण तालुक्यातील आंबेघर गावामधे  एन डी आर एफ ची टीम अद्यापही पोहचू शकलेली नाही

सातारा जिल्ह्यात पावसाने मध्यरात्रीनंतर काहीशी उघडीप दिली होती. मात्र पहाटेपासुन पुन्हा पाऊस सुरु झालाय.  कोयना धरणातून 53 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कालपासून त्यामधे वाढ करण्यात आलेली नाही.  पाटण तालुक्यातील आंबेघर गावामधे  एन डी आर एफ ची टीम अद्यापही पोहचु शकलेली नाही.  आंबेघरमधे भुस्खलन होऊन 14 लोक कालपासून बेपत्ता आहेत.  आज सकाळी एन डी आर एफ ची टीम आणि प्रशासकीय अधिकारी पुन्हा बोटींच्या सहाय्याने आंबेघरमधे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. कराडमधील प्रिती संगमावरील यशवंतराव चव्हाणांचे स्मृतीस्थळाला अजूनही पाण्याचा वेढा आहे. पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंदच आहे.

मुंबईच्या सायन कोलीवाडा परिसरामध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईचा सायन कोलीवाडा परिसरामध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.  इमारत रिकामी असल्याची माहिती आली आहे. 

सातारा : कराड येथील यशवंतराव चव्हाण यांची संपूर्ण समाधी पाण्याखाली

कराड येथील यशवंतराव चव्हाण यांची संपुर्ण समाधी पाण्याखाली, कृष्णा कोयना नदीच्या संगमावरची समाधी पाण्याखाली, दोन्ही नद्यांना महापुर आल्याने समाधीसह संपुर्ण परिसर गेला पाण्याखाली, कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा परिणाम, कराड शहरातील काही भागात पाणी घुसले

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची येथे दरड कोसळली, रहिवासी अडकल्याची शक्यता

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे दरड कोसळली. पोलादपूर तालुक्यातील आंबेमाची येथे दरड कोसळली असून दरडीखाली काही रहिवासी अडकल्याची शक्यता आहे

चिपळूण येथील कामथे रुग्णालयात पूर परिस्थीमुळे रुग्णालयातील 11 जणांचा मृत्यू


 रत्नागिरी जिह्यातील चिपळूण येथील कामथे रुग्णालयात पूर परिस्थीमुळे रुग्णालयातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे.  वेळेवर उपचारांसाठी सुविधा उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला आहे. 

आंबोली घाटात कोसळलेली दरड हटवली, सावंतवाडी - बेळगाव आणि कोल्हापूरला जाणारी वाहतूक पूर्वरत


सावंतवाडी-बेळगाव राज्यमार्गावर आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड व माती कोसळली होती. हा मार्ग वाहतुकीस महत्त्वाचा असल्याने दरड व माती हटवून तो वाहतुकीस मोकळा केला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरड कोसल्याने सावंतवाडी-बेळगाव व कोल्हापूर मार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळताच याची तात्काळ दखल घेऊन दरड व माती हटवून हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात तेरेखोल नदीतील आठ फूट मगर पाण्याच्या प्रवाहासोबत गावात

सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावात तेरेखोल नदीतील आठ फूट मगर पाण्याच्या प्रवाहासोबत गावात आली आहे. ग्रामस्थांनी पकडून ती बांदा शहरातील बाजारपेठेत असलेल्या वनविभाग कार्यालयाकडे सुपूर्त केली. ही मगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. तेरेखोल नदीला पूर आल्याने मगरी गावात येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.

सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली, सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता वाहतूकीसाठी बंद

सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली गेले आहे. यामध्ये राज्य महामार्ग 8 व प्रमुख जिल्हा मार्ग 17 अशा 25 रस्त्यांचा समावेश आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज व खानापूर या तालुक्यांमधील 25 रस्ते पाण्याखाली गेले आहे. सांगली - कोल्हापूर बायपास रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे. 

पाण्याचा प्रवाहाने रस्ता वाहून गेला असून दोन्ही बाजूची वाहतूक थांबली

पाण्याचा प्रवाहाने रस्ता वाहून गेला असून दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.  महाबळेश्वरात मधील लिंगमळा वॉटरफॉल  येथील घटना 

पुण्यातील रास्ता पेठ येथे मोठे झाड रिक्षाचालकाच्या अंगावर पडले

पुण्यातील रास्ता पेठ, केईएम रुग्णालयासमोर मोठे झाड कोसळून रिक्षाचालकाच्या अंगावर पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवित रिक्षाचालकाची जखमी अवस्थेत सुटका केली. रिक्षाचालक बचावला.



सोलापुरात मुसळधार पावसाला सुरुवात

सोलापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  शहरात मागील तासाभरापासून पावसाची हजेरी

 महाड तालुक्यातील तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, दरड दुर्घटनेतील व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

Rain Update : रायगड :  महाड तालुक्यातील तळीये येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, दरड दुर्घटनेतील व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, एनडीआरएफ , एसडीआरएफ , कोस्टगार्ड, नेव्ही यांच्या प्रत्येकी दोन टीम घटनास्थळी रवाना, स्थानिक 12 रेस्क्यू टीम रवाना, बसच्या मदतीने अत्यावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत  

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली
केंद्राकडून नेव्ही रेस्क्यू टीम तातडीनं दाखल व्हाव्यात ही मागणी, एनडीआरएफची टीमही काही ठिकाणी पाणी जास्त असल्यानं पोहचू शकत नाही, त्यामुळे नेव्हीची टीम अशा ठिकाणी पोहचणं आवश्यक आहे सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, राजनाथ सिंह यांनी शब्द दिलाय, तातडीनं नेव्हीची मदत पूर्ण ताकदीनं पोहोचेल, पाच आणखी हेलिकॉप्टर वाढवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत, दोन्ही मंत्र्यांनी तातडीनं सहकार्याची ग्वाही दिली, त्याबद्दल मनापासून आभार, पुढच्या दोन तीन दिवसात आणखी किती गरज आहे याचा अंदाज येईल, नौदलाच्या टीम पुढचे पाच सहा दिवस महाराष्ट्रातच थांबण्याची गरज आहे कारण पुन्हा अतिवृष्टीचा इशारा आहे त्यामुळे त्या इथून जाणं, परत येणं परवडणारे नाही,महाडला नेव्हीचं एक कायमस्वरुपी स्टेशनच असावं,  पुण्यातून मुंबईतून मदत जाते त्याऐवजी कोकणात कायमस्वरुपी स्टेशन झालं तरच भविष्याचं दृष्टीनं खूप प्रभावी ठरेल

तळीये गावात 25 ते 30 घरांवर दरड कोसळली, पाऊस सुरु असल्यानं मदतकार्यात अडथळे, मृतांची संख्या वाढण्याची भीती, मंत्री आदिती तटकरे, खासदार संजय तटकरे घटनास्थळी

तळीये गावात 25 ते 30 घरांवर दरड कोसळली, पाऊस सुरु असल्यानं मदतकार्यात अडथळे, मृतांची संख्या वाढण्याची भीती, मंत्री आदिती तटकरे, खासदार संजय तटकरे घटनास्थळी

मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल , आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसून मुख्यमंत्री घेत आहेत आढावा

मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल ,


आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसून मुख्यमंत्री आढावा घेत आहेत,


सोबत आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई आहेत

मेंगलोरहून मुंबईला येणारी एक्सप्रेस गोव्यात रुळावरून घसरली, एक्सप्रेस जात असतानाच वरून दरड कोसळल्याने एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून खाली, जीवितहानी नाही

मेंगलोरहुन मुंबईला येणारी एक्सप्रेस गोव्यात रुळावरून घसरली, सोनोलिम आणि दूधसागर स्टेशन दरम्यान झाला अपघात, एक्सप्रेस जात असतानाच वरून दरड कोसळल्याने एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून खाली आले, साउथ सेंट्रल रेल्वे नेम दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोणीही जखमी नाही, मात्र हा मार्ग काही काळासाठी बंद राहील, मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची कारण कोकण रेल्वे सध्या बंद आहे, त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या या मार्गावरून मुंबईच्या दिशेने डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत, मंगलोर एक्सप्रेस देखील डायव्हर्ट करण्यात आली होती, मात्र तीच घसरल्याने आता मुंबईकडे येणारा दुसरा मार्ग देखील बंद झाला आहे,

सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल , रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार

सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल , रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार,


एक पथक आष्टा, शिरगाव येथे कार्यरत,


जिल्ह्यात आतापर्यंत 100 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले असून त्यांनी व्यवस्था दोन निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली,


आयर्विन पुलाखाली पाणी पातळी 50 फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत, व्यापारीपेठेत पाणी येवू शकते त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या साहित्याची हलवाहलव करावयाची असल्यास त्यांनाही मुभा देण्यात आलीय

पोलादपूर तालुक्यातील गोवेले सुतारवाडी आणि केवनाळे येथे दरड कोसळली

Rain Update : रायगड :   पोलादपूर तालुक्यातील गोवेले सुतारवाडी आणि केवनाळे येथे दरड कोसळली,  केवनाळे येथील दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, गोवेले सुतारवाडी येथे 5 जणांचा मृत्यू,  13 जखमी, जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं 

पुण्यात पावसाला सुरुवात,  शहरातील विविध भागात पावसाच्या सरी

Rain Update : पुण्यात पावसाला सुरुवात,  शहरातील विविध भागात पावसाच्या सरी, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूचं, पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार...

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवला,सांगली आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत काहीसा दिलासा देणारी बातमी

सांगली आणि कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत काहीसा दिलासा देणारी बातमी. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. अल्मट्टी धरणातून सकाळी 8 वाजेपर्यंत 1 लाख 17 हजार 428 क्यूसेक गतीने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र हा विसर्ग वाढवून 2 लाख क्यूसेक करण्यात आला आहे. अल्मट्टी धरणाचे 26 दरवाजे सकाळी 10 वाजता उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून तब्बल 1 लाख 57 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून देखील 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. पूर परिस्थितीबाबत मागील महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारमध्ये संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली होती. या बैठकीचे सकारात्मक प्रतिसाद आता दिसून येतायत.

पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज

चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे.


या स्थितीबाबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांना सांगितले.


काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत. 

मुसळधार पावसाने मेळघाटचे जनजीवन विस्कळीत

Rain Update : मुसळधार पावसाने मेळघाटचे जनजीवन विस्कळीत,  धारणी तालुक्यातील राणीगावजवळील घाटात मुख्य रस्त्यावर दरड कोसळून 10 गावांचा संपर्क तुटला 

सातारा जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन,  पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर डोंगर कोसळला

सातारा जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन,  पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर डोंगर कोसळला , सात ते आठ घरं गाडली गेल्याची माहिती , पंधरा ते वीस घर घरांचे नुकसान , मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे गावात हाहाकार, एका कुटुंबाला बाहेर काढण्यात यश, या  कुटुंबातील एका बालकाचा मृत्यू , गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मदतकार्यात अडथळा

मुंबई गोवा हायववेरील पाणी ओसरले... माणगाव महाड महामार्गावरील पाणी ओसरले

मुंबई गोवा हायववेरील पाणी ओसरले... माणगाव महाड महामार्गावरील पाणी ओसरले... 


रेस्क्यू टीम महाडच्या दिशेने रवाना ..

उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा  दूध पुरवठा बंद राहणार, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर परिणाम


उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा  दूध पुरवठा बंद राहणार, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर परिणाम



काल 76 हजार लिटर संकलन घटल



आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज



पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलन आणि विक्री वर देखील परिणाम


अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती

कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावरून थेट पाच फुटांवर ,  तब्बल पन्नास हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू


 कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावरून थेट पाच फुटांवर ,


 तब्बल पन्नास हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू ,


नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ ,


कराड सांगली शहराला मोठा धोका ,



नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा ,


कराडमधील अनेक घरं स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू,


 जवळपास अडीचशे लोकांना केले स्थलांतर,

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडले

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटाने उघडले,
दरवाजातून 9 हजार 567 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू,
तर पायथा विद्यात गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका, 


कृष्णा नदीची पाणी पातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते,


जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई गोवा हायवेवर वीर नजीक एनडीआरएफ टीम पोहोचली

मुंबई गोवा हायवेवर वीर नजीक एनडीआरएफ टीम पोहोचली आहे ..  काल रात्रीपासून एनडीआरएफ टीम ही वीर रेल्वे स्थानकाजवळ अडकली आहे.  महामार्गावर पाणी साचल्याने    एनडीआरएफ आणि इतर रेस्क्यू टीम अडकल्या आहेत...

सांगलीत कर्नाळ रोडवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद

सांगलीत कर्नाळ रोडवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीय. या रोडवर असणारी बांबू दुकाने, अन्य दुकाने पाण्यात गेलीत. यामुळे बांबू सध्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. हे बांबू एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातोय.

सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरले

सांगलीच्या अमरधाम स्मशान भूमीत पुराचे पाणी शिरले.. या ठिकाणी होणारे अंत्यसंस्कार कुपवाड स्मशानभूमीत केले जातील.

गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे 0.5 मीटरने उघडले

भंडारा जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे 0.5 मीटरने आज सकाळी 6 वाजता उघडण्यात आले आहेत.  नदीपात्रा जवळील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आंबोली नांगरतास पुलावर पाणी,  दगड पडल्याने घाटात रस्त्यात पाणी

सिंधुदुर्ग :  आंबोली नांगरतास पुलावर पाणी,  दगड पडल्याने घाटात रस्त्यात पाणी, आंबोली घाटात मोठे दगड कोसळले आहे.धबधब्याच्या पुढे 2 किलोमीटर कार अडकली  

पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात तुफानी पाऊस बरसला

पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात तुफानी पाऊस बरसला. गेल्या चोवीस तासात 11.68 टक्के तर गेल्या 48 तासात एकूण 21.67 टक्के पाणी साठ्यात वाढ झालीये. सध्या धरणात 66.75 टक्के साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ 35 टक्के साठा शिल्लक होता. दोनच दिवसात 459 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली.

डेक्कन आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद

Satara Rain Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, डेक्कन आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद #pune #rain #rainupdate 

महाबळेश्वरमध्ये रात्री 1 पर्यंत 483 मिमी पावसाची नोंद, पावसाचा जोर सुरुच, आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता

महाबळेश्वरमध्ये रात्री 1 पर्यंत 483 मिमी पावसाची नोंद, पावसाचा जोर सुरुच त्यामुळे आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता,


२२ जुलै २०२१ रोजी महाबळेश्वरमध्ये सकाळी ८:३० पर्यंत ४८० मिमी पावसाची नोंद,


आॅल टाइम हाय रेनफाॅल - ११ आॅगस्ट २००८ : ४९०.७ मिमी, ७ जुलै १९७७ : ४३९.८ मिमी ,


महाबळेश्वरमधील पाऊस म्हणजे सोप्या शब्दात : 


जुलै महिन्यातल्या नवी दिल्लीच्या ८० पट एका दिवसाच्या सरासरी एवढा पाऊस 


जुलै महिन्यातल्या कोलकाताच्या ३७ पट एका दिवसाच्या सरासरीएवढा पाऊस 


जुलै महिन्यातल्या मुंबईच्या १८ पट एका दिवसाच्या सरासरीएवढा पाऊस

लोणावळ्यात गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस

लोणावळ्यात गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे चोवीस तासात 322 मिमी पावसाची नोंद झाली. तर गेल्या 48 तासात 712 मिमी पाऊस कोसळला. परिणामी लोणावळा शहर आणि परिसरातुन वाहणारी इंद्रायणी नदी पात्र सोडून वाहत होती. काही ठिकाणी सखल भागात पाणी ही साचले होते.

महाडमध्ये भारतीय नौदलाचे जवान पोहोचले

महाड मध्ये भारतीय नौदलाचे जवान पोहचले आहेत. हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्नाची पाकिटं देण्याचं यासोबतच पाण्यात कुणी अडकलं आहे का याची पाहणी सुरू आहे. रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आणि नदीला पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास 2 मजल्यापर्यंत पाणी आल्याची परिस्थिती होती

सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचली

सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचली असून सध्या आयर्विन पुलावर पाणी पातळी 38 फुटांच्यावर गेली आहे. कृष्णेची 40 फूट इशारा पातळी तर 45 फूट धोका पातळी आहे. 

विदर्भात अनेक जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाची हजेरी

Monsoon update : विदर्भात अनेक जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील तीन तास नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावतीतील अनेक भागांत मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि गडचिरोलीतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महाबळेश्वरमध्ये रात्री 1 पर्यंत 489 मिमी पावसाची नोंद

महाबळेश्वरमध्ये रात्री 1 पर्यंत 489 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर सुरुच त्यामुळे आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 22 जुलै 2021 रोजी महाबळेश्वरमध्ये सकाळी 8:30 पर्यंत 480 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ऑल टाइम हाय रेनफाॅल - 11 ऑगस्ट 2008 : 490.7 मिमी, 7 जुलै 1977 : 439.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. 


महाबळेश्वरमधील पाऊस म्हणजे सोप्या शब्दात : 



  • जुलै महिन्यातल्या नवी दिल्लीच्या 80 पट एका दिवसाच्या सरासरी ऐवढा पाऊस 

  • जुलै महिन्यातल्या कोलकाताच्या 37 पट एका दिवसाच्या सरासरी ऐवढा पाऊस 

  • जुलै महिन्यातल्या मुंबईच्या 18 पट एका दिवसाच्या सरासरी ऐवढा पाऊस

रायगड : पाचाड रस्त्यावर पडलेली दरड हटवली, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रायगड : पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरड ग्रस्त भागात निघाले आहे. हेलिकॉप्टर काही वेळेत महाडमध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येईल. लाडोली येथील आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा. या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी मंदिराच्या आतमध्ये शिरले आहे.

पुण्यात नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. 

पुण्यात नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. 
आज रात्री 11 वाजता खडकवासला धरणातून 25036 क्यूसेक्स इतका विसर्ग करण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली-नरडवे मार्गावरील नाटळ आणि कुंभवडे गावांना जोडणारा मल्हारी पूल कोसळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली-नरडवे मार्गावरील नाटळ आणि कुंभवडे गावांना जोडणारा मल्हारी पूल कोसळला आहे. मल्हारी पुल कोसल्याने नाटळ, दारिस्ते, दिगवळे, नरडवे या गावांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे.

खडकवासला धरणातून 18491 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये करण्यात येणार

खडकवासला धरणातून 18491 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये करण्यात येणार आहे. धरण क्षेत्रामध्ये अजून सुद्धा पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत..कारण पाण्याचा वाढता विसर्ग पाहता हे रस्ते देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे..

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावले येथील वस्तीवर दरड कोसळली

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढावले येथील वस्तीवर दरड कोसळली. अनेकजण गाडले गेल्याचा अंदाज. दुपारपासूनच या दरडीवर ग्रामस्थ लक्ष ठेवून होते. चारपाच घरे वगळता सर्व घरे गाडली गेल्याची माहिती.

रेंगडी गावातील पाच शेतकरी गेले वाहून, मेढा महाबळेश्वर रोडवरील रेंगडी येथील घटना

रेंगडी गावातील पाच शेतकरी गेले वाहून. मेढा महाबळेश्वर रोडवरील रेंगडी येथील घटना. शेतातील काम करुन घरी परतताना ही घटना घडली असून पाचपैकी एक महिला सापडली आहे तर चार जणांचा शोध सुरु आहे. अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे.

भिवंडी शहरातील 2030 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतरित

मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते तर हजारो घरं व दुकानांमध्ये पाणी शिरले असून हजारो लोक अडकली होती. भिवंडी मनपा आपत्कालीन पथक व अग्निशमन दल तसेच टीडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सहाय्याने शहरातील 2030 नागरिकांना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे तर या नागरिकांची राहण्याची व्यवस्था महानगरपालिकाच्या वतीने समाज हॉल तसेच शाळा परिसरात करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदेड ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे रद्द

नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात होणाऱ्या धुवांधार व मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड ते मुंबई जाणाऱ्या रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चालू असणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झालेय. त्यामुळे नांदेड ते छत्रपती टर्मिनस मुंबई जाणारी रेल्वे गाडी क्र-07617, मुंबई नांदेड तपोवन स्पेशल रेल्वे गाडी क्र-07612, मुंबई नांदेड राजराणी स्पेशल रेल्वे गाड्या आज घडीला रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना ते छत्रपती टर्मिनस मुंबई जाणारी रेल्वे गाडी क्र-02272, तसेच मुंबई व्हाया जालना जाणारी जनशताब्दी स्पेशल रेल्वे गाडी क्र-02271 ह्या आज दि-22-07-21 रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

तानसा व मोडक सागर या धरणातून पाण्याचा विसर्ग

मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा व मोडक सागर या धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तानसा नदीवरील खडवली गावातील  पुल पाण्याखाली गेल्याने तसेच नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने पुलावरील रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे.

कर्जत तालुक्यातील दामत येथे उल्हास नदीच्या प्रवाहात मध्यरात्री वडील आणि मुलगी वाहून गेले

कर्जत तालुक्यातील दामत येथे उल्हास नदीच्या प्रवाहात मध्यरात्री वडील आणि मुलगी वाहून गेले असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. इब्राहीम मुनियार वय 40 वर्षे आणि झोया मुनियार (वय 5 वर्ष) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेत. नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंबीय घराबाहेर पडले होते. दोन भाऊ आणि आईला वाचविण्यात यश.

लोणावळ्यात दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद, लोणावळ्यात दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद

लोणावळ्यात दहा तासांत 163 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. तर गेल्या 34 तासांत 553 मिमी पाऊस कोसळला आहे. यामुळे लोणावळ्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा प्रवाह वाढला असून पात्र सोडून ती वाहू लागली आहे. परिणामी सखल भागात पाणी शिरले आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

सांगलीत कृष्णा नदी काठासाठी धोक्याची घंटा

सांगलीत कृष्णा नदी काठासाठी धोक्याची घंटा. नदीच्या पाणी पातळीत 25 फुटांपर्यंत वाढ. सकाळपासून 12 फूटाने पाण्याची पातळी वाढली.

पुढील 3 तास सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता

उद्या सकाळी कोयना धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करणार

उद्या सकाळी कोयना धरणातून दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करणार. कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे कोयना प्रशासनाचा निर्णय. कोयना धरणात सध्या  73 टीएमसी इतका पाणीसाठा तर कोयना धरणातली आवकही 80 हजार क्युसेस पेक्षाही जास्त.

माथेरान, खंडाळा, सातारा, महाबळेश्वर, पुणे, रायगडसह रत्नागिरी येथे पावसाचे मोठे ढग

माथेरान, खंडाळा, सातारा, महाबळेश्वर, पुणे, रायगडसह रत्नागिरी येथे पावसाचे मोठे ढग पाहायला मिळत आहेत. पुढील 3 ते 4 तास या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे परिसरातही ढगाळ वातावरणात असून अधून मधून मुसळधार सरी कोसळत आहेत.

पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही

पुणे-मुंबई धावणारी डेक्कन क्वीन उद्या सकाळी धावणार नाही. लोणावळा ते कर्जत दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने आणि रेल्वे मार्गखालील भाग वाहून गेल्याने असा निर्णय घेण्यात आलाय. डेक्कन क्वीन आज सायंकाळी पाच वाजता मुंबईवरून पुण्याकडे रवाना होते. पण तिथून ती आज धावणार नसल्याने उद्या ती पुण्यातून मुंबईकडे धावणार नाही हे स्पष्ट झालंय. तशी माहिती पुणे रेल्वेने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील वाईच्या गणपती घाटाला लागले पाणी

सातारा जिल्ह्यातील वाईच्या गणपती घाटाला लागले पाणी. काही मंदिरे पाण्याखाली तर मुख्यगणपती मंदिरालाही लागले पाणी. महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील पावसाचा कृष्णा नदीवर परिणाम. कृष्णा नदीला पूर परिस्थिती. धोम धरणातून पाणी न सोडताच नदीला पूरपरिस्थिती.

महाबळेश्वर तालुक्यातील दाभे मोहन गावात दहा वर्षात पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याचा गावकऱ्यांचा दावा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात पावसाने चांगलीच बॅटिंग सुरु ठेवल्यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या गावांना याचा मोठा फटका बसलाय. महाबळेश्वर तालूक्यातीलच “दाभे मोहन" येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळे दाभे मोहन या गावासह चतुरबेट, शिंदेवाडी दाभेकर, शिरनार, खरोशी या गावांची संपुर्ण वाहतूक बंद झाली आहे. जंगलभाग समजला जाणारा भाग असून या पाच गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता असून गेल्या दहा वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच या गावाने अनुभवला आहे. इतरवेळी पाण्याखाली पुल गेल्यानंतर वहिवाट होत असते. मात्र, यंदाचा हा पाऊस म्हणजे खूपच मोठा असल्याच ग्रामस्थांच म्हणणे आहे.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण व वागदे येथे पाणी आल्याने वाहतूक बंद

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण व वागदे येथे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. वैभववाडीतील लोरे गावात शिवगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वैभववाडी - फोंडाघाट वाहतूक बंद. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावातील उगवाई नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ, उगवाई नदीपात्रानजीक फोंडेकरवाडीत नदीचे पाणी शिरले. कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले. तर खारेपाटण हायस्कुल ते खारेपाटण बाजारपेठ-बसस्थानककडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला.  चिंचवली - खारेपाटण रस्ता पाण्याखाली गेला असून चिंचवली गावचा संपर्कही तुटला. कणकवली मधील नांदगाव परिसरात नदिचे पाणी शिरल्याने बराच भाग पाण्याखाली गेला आहे. नांदगाव ओटव रस्त्यावरुन नदीचे पाणी वाहू लागल्याने नांदगाव ओटव संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.

14 तासांपासून कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या आता नाशिकच्या दिशेने रवाना

मागील 14 तासांपासून कसारा रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या एक्सप्रेस गाड्या आता नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कसारा इगतपुरी मार्ग वरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. मात्र त्यातील डाऊन मार्गावरील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या लाईनहुन  पंजाब मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात येत आहेत . अप मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून या मार्गावर काम सुरू आहे

कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली

Maharashtra Mumbai Rains LIVE : कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली,  पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर पोहोचली, 39 फूट इशारा तर 43 फूट धोक्याची पातळी  #Rain #RainUpdate 

अकोल्यात विक्रमी 202.9 मिमी पाऊस. शहरातील अनेक भाग पाण्याखाली

अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एका दिवसभरात विक्रमी 202.9 मिलिमीटर पाऊस झालाय. या ढगफुटीसदृष्य पावसाने संपुर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडालाय. जिल्ह्यातील अनेक भागातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेय. अनेक ठिकाणी प्रशासनाला नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलंय. जिल्ह्यातील सातही तालूक्यात पाऊस आणि पुरानं शेतीचं मोठं नुकसान झालंय.  

भिवंडी शहरातील कामवारी नदी किनारी असलेल्या संगमपाडा ,म्हाडा कॉलोनी, ईदगाह या वस्त्यामध्ये पाणी

मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील कामवारी नदी किनारी असलेल्या संगमपाडा ,म्हाडा कॉलोनी, ईदगाह या वस्त्यामध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिक अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी टीडीआरएफची टीम दाखल झाली असून रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 8 ते 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे

कुडाळ तालुक्यात आम्बेरी पुलावर पाणी
कुडाळ तालुक्यात आम्बेरी पुलावर पाणी आलेले आहे. सावंतवाडी तालुक्यात शिरशिंगे पुलावर पाणी आल्याने या गावात जाणारी वाहतूक बंद. तहसीलदार वैभववाडी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सद्यःस्थितीत करूळ घाट व भुईबावडा घाट मार्गे वाहतूक बंद. फोंडा घाट व आंबोली मार्गाने वाहतूक सुरू आहे.

कोकणातील पूरपरिस्थिती वर मुख्यमंत्री यांच्या उपस्थित आढावा बैठक सुरू

कोकणातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितित आढावा बैठक सुरू, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारीही उपस्थित

 कोकणात पुढील 2 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज , रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला रेड अलर्ट कायम

 


 कोकणात पुढील 2 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज , रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला रेड अलर्ट कायम , मध्य महाराष्ट्रात आज देखील सर्वत्र पावसाची शक्यता ,कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता , मुंबईत देखील आज मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे, साधारण 100-200 मिमी पाऊस मुंबईतील काही उपनगरांमध्ये बघायला मिळू शकतो, वाऱ्यांचा वेग 40-50किमी प्रति तास राहणार

कोल्हापुरातील रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टची तारीख वाढवली....उद्यापर्यंत रेड अलर्ट..तर 25 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापुरातील रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टची तारीख वाढवली....उद्यापर्यंत रेड अलर्ट..तर 25 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला..

लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प, आत्तापर्यंत रद्द झालेल्या रेल्वे

लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प, आत्तापर्यंत रद्द झालेल्या रेल्वे


पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या
1) डेक्कन एक्सप्रेस
2) डेक्कन क्वीन
3) इंद्रायणी एक्सप्रेस
4) कोयना एक्सप्रेस


मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या
1) मुंबई-लातूर
2) गदख एक्सप्रेस
3) मुंबई-हैदराबाद-1
4) मुंबई हैदराबाद-2


तर मुंबई-भुवनेश्वर धावणारी रेल्वे आज पुणे-भुवनेश्वर अशी 5:45 ला धावेल. 


संध्याकाळची परिस्थिती पाहून पुढील रेल्वेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळली. रेल्वे वाहतूक ठप्प. चार ते पाच ठिकाणी दरड हटविण्यात यंत्रणा व्यस्त

लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळली. रेल्वे वाहतूक ठप्प. चार ते पाच ठिकाणी दरड हटविण्यात यंत्रणा व्यस्त. सायंकाळ नंतर वाहतूक बंदच राहणार. कोणतीही जीवितहानी नाही.

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे खोळंबली, जाणून घ्या महत्वाच्या गाड्यांबाबत अपडेट

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान  वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत. खालील स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले आहे. 


 ट्रेन क्रमांक 01134 मंगलरू जं. - मुंबई सीएसएमटी स्पेशल दि. 21/07/2021 रोजी कामठे स्थानकातून 05:17 वाजेपासून नियमित केली आहे. 
 ट्रेन क्र. 02617  एर्नाकुलम - एच. निजामुद्दीन डेली स्पेशल दिनांक 21/07/2021 रोजी सकाळी 3::36 वाजेपासून संगमेश्वर रोड स्थानकातून नियमित केली आहे. 
 ट्रेन क्रमांक 04695  कोचुवेली - अमृतसर साप्ताहिक विशेष दिनांक 21/07/2021 रोजी रत्नागिरी स्थानकातून 7:17 वाजेपासून नियमित केली आहे. 
 ट्रेन क्र. 06346 तिरुवनंतपुरम मध्यवर्ती - लोकमान्य टिळक (दि.) दिनांक 21/07/2021 रोजी सकाळी 8: 06 वाजेपासून विलावडे स्थानकातून नियमित केली आहे. 
 ट्रेन क्र 06072 तिरुनेलवेली - दादर स्पेशल दि. 21/07/2021 रोजी 08:24 वाजेपासून राजापूर रोड स्थानकातून स्टेशन नियमित केली आहे. 
 ट्रेन क्र 06001 तिरुअनंतपुरम मध्यवर्ती - एच. निजामुद्दीन स्पेशल दि. 21/07/2021 रोजी वेरणा स्थानकातून 09:06 वाजता निघाली.
 ट्रेन क्र. 01114 मडगाव - मुंबई सीएसएमटी ‘मांडोवी’ स्पेशल दि. 22/07/2021 रोजी सकाळी 06:14 वाजता मजोर्डा स्थानक सोडले.
 ट्रेन क्रमांक 01003 दादर - सावंतवाडी रोड. दिनांक 22/07/2021 रोजी चिपळूण स्थानकात 06:14 पासून नियमित केली जाईल
 ट्रेन क्र. 01151  मुंबई सीएसएमटी - मडगाव ‘जनशताब्दी’ विशेष दि. 22/07/2021 रोजी खेड स्थानकात 09:07 वाजेपासून नियमित केली जाईल

कोळकेवाडी धरणातल्या पाण्याचे नियोजन नीट न केल्याने चिपळूणला पुराचा फटका, खासदार विनायक राऊत यांचा आरोप

कोळकेवाडी धरणातल्या पाण्याचे नियोजन नीट न केल्याने चिपळूणला पुराचा फटका, खासदार विनायक राऊत यांचा आरोप, काल रात्री एकच्या सुमारास हे पाणी सोडलं गेलं,  कुठल्याही पद्धतीचा इशारा  आधी दिला गेला नव्हता, आज दुपारी तीन वाजताच्या फ्लाईटने मुंबईत पोहचणार, पेढे गावाला सर्वाधिक फटका, एनडीआरएफच्या दहा टीमची गरज आहे त्यापैकी 3 सध्या पोहोचल्या आहेत, मुख्यमंत्र्यांशी अधिकच्या मदतीसाठी बोलणं चालू आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

परभणी जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी,  मागच्या 24 तासात 111 मिमी पावसाची कृषी विद्यापीठात नोंद. जिल्ह्यातील गोदावरी, दुधना नद्या तुडुंब, करपरा नदीलाही पूर, परभणी-पाथरी, परभणी-जिंतुर महामार्ग बंद 

परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झालीय मागच्या 24 तासात परभणीत तब्बल 111 मिमी पावसाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात करण्यात आलीय.शिवाय जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा पासून यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पडलाय त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असुन गोदावरी,दुधना नद्या तुडुंब भरून वाहत आहेत तर करपरा नदीला पूर आलाय ज्यामुळे परभणी-जिंतुर महामार्ग बंद पडलाय.वाहतूक बंद झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.शिवाय परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग ही बंद आहे.लोअर दुधना प्रकल्पातून 12 दरवाज्याद्वारे नदीपात्रात 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने दुधना नदी तुडुंब भरून वाहतेय तर गोदावरी वरील ढालेगाव,मुदगल,खडका बंधारा भरल्याने या बंधाऱ्यातून ही पाण्याचा विसर्ग सुरुय ज्यामुळे गोदावरी नदी ही तुडुंब भरून वाहतेय..सध्या जिल्ह्यात सोनपेठ मधील 7 गाव,पालम मधील 7,सेलूतील 10 ते 12 गाव,जिंतुर मधील 10 ते 15 गाव अशा जवळपास 40 ते 45 गावांचा संपर्क तुटलाय..मोठ्या प्रमाणावर नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने कापूस, सोयाबीन,तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे...

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे

 लामज – 498 मिलीमिटर 
 तापोळा – 486 मिलीमिटर
 महाबळेश्वर - 480 मिलीमिटर
 नवजा - 427 मिलीमिटर
 कोयना – 425 मिलीमिटर

सध्या बचावकार्यावर भर, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या बचावकार्यावर भर, एनडीआरएफ 2 टीम रत्नागिरीला, पालघरला , अलिबागला तर  सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये टीम तैनात करणार, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती  #Rain #RainUpdate

चिपळूणसाठी सरकारचा रेस्क्यू प्लॅन तयार, रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना 

चिपळूणसाठी सरकारचा रेस्क्यू प्लॅन तयार, रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना ,


एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीम थोड्याच वेळात चिपळूणात दाखल होणार ,


कोस्ट गार्डचा हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने लोकांना रेस्क्यू करणार ,


पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था करणार ,


जिवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश ,


कोकणातले सर्वच महत्वाचे नेते चिपळुणात होणार दाखल,

कोकणात जोरदार पावसामुळं पूरस्थिती, खासदार विनायक राऊत तातडीनं दिल्लीहून कोकणासाठी रवाना, पालकमंत्री अनिल परब सध्या रत्नागिरीत 

कोकणात जोरदार पावसामुळं पूरस्थिती, खासदार विनायक राऊत तातडीनं दिल्लीहून कोकणासाठी रवाना, पालकमंत्री अनिल परब सध्या रत्नागिरीत 

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगावात पाणी शिरल्याने नुकसान

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगावात पाणी शिरल्याने नुकसान...


रात्री अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस...


सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गरजदरी या मध्यम धरणाच्या ओहरफ्लोमधून पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात झाला..


गरजदरीच्या समोर असलेल्या दहीगाव रेचा येथूनच हा नदी वजा नाला वाहत असल्याने गावानजीक असलेली पुर संरक्षण भिंत ढासळून नाल्यानजीक असलेल्या घरांचे नुकसान झाले.


गावात पाणी शिरल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी तातडीने गावाला भेट देउन पाहणी सुरू...

माणगाव तालुक्यातील पाटणुस गावाजवळील जुना पुलाचा काही भाग तुटला...

माणगाव तालुक्यातील पाटणुस गावाजवळील जुना पुलाचा काही भाग तुटला...


पाटणुस व म्हसेवाडी,गोळेवाडी, फणशिदांड आदिवासीवाडी गावाना जोडणारा पूल तुटला..  सुमारे शंभर वर्षे जुना पुल पुराच्या पाण्याने तुटला.. 


कुंडलिक नदिनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुलाचे नुकसान... 


 गेल्या चार ते पाच वर्षांतील कुंडलिका नदीच्या पातळीत मोठी वाढ.. 



उभेयी धरणातुन मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात आले ...

पालघरमधील कोहोज किल्ल्याच्या खालील पाझर तलाव फुटला , भात शेतीचे मोठे नुकसान,

 


पालघर - 


पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काल मध्यरात्रीच्या सुमारास वाडा  तालुक्यातील शेलटी येथील कोहोच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाझर तलावाला भगदाड पडल्याने रात्री एकच खळबळ उडाली . तलावाचं पाणी अचानक शेलटी गावात आणि लागवड केलेल्या शेतीत गेल्याने मोठं नुकसान झालं आहे . शेलटी गावातील 300 नागरिकांना मध्ये रात्री प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं असून उर्वरित नागरिकांना गावातील उंचवट्याच्या जागी राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं . फुटलेल्या तलावाचं पाणी गावात शिरल्याने गावातील पाच ते सहा घरांच मोठं नुकसान झालंय . 

गेल्या 24 तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये भरघोस वाढ, तानसा आणि मोडक सागर भरले


गेल्या 24 तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये भरघोस वाढ,  दोन दिवसाच्या मुसळधार पावसात 129 दिवसाचा म्हणजे सव्वाचार महिन्यांचा पाणीसाठा वाढला,  एका दिवसात 65 दिवसांचा पाणीसाठा वाढला तर काल दिवसा आणि रात्रभरात कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर 247834 दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला, काल रात्रीच्या मुसळधार पावसात तानसा आणि मोडक सागरही भरले, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ४ धरणे ओव्हरफ्लो,  आता प्रतिक्षा भातसा आणि मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भरण्याची  

सोलापुरात काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच, काल दिवसभरात 13.9 मिमी पावसाची नोंद

सोलापूर - 


सोलापुरात काल सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच


काल दिवसभरात 13.9 मिमी पावसाची नोंद


तर आज सकाळी 8:30 च्या नोंदीनुसार शहरात 9.9 मिलिमीटर पाऊस

मुसळधार पावसामुळे रेल्वेला मोठा फटका, काही ठिकाणी तर ट्रॅकच वाहून गेले


मुसळधार पावसामुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तर ट्रॅकच वाहून गेले मात्र सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेचा युद्धपातळीवर काम सुरू आहे. काही सेक्शन्स सुरक्षित आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे काम करण्यास अडचणी येत आहेत. हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आली असून प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी फूड स्टॉल्स सुद्धा उभारण्यात आले आहेत. 

सांगली जिल्ह्यात सलगच्या संततधार पावसाने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 सांगली जिल्ह्यात मागील २६ तासापासून सलग संततधार सुरू आहे. या संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी देखील वाढू लागली आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 13 फुटाच्या वर गेली आहे. दुसरीकडे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत असल्याने आज कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून २१०० स्क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने आणखी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते.  यामूळे सांगली पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय . तसेच कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या २४ तासात हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
लोणावळ्यात या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झालीये. गेल्या चोवीस तासात तब्बल 390 मिलिमीटर पाऊस कोसळला

लोणावळ्यात या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद झालीये. गेल्या चोवीस तासात तब्बल 390 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. या मोसमात आत्तापर्यंत 2317 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ 1372 मिमी पाऊस पडला होता

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला... काजळी नदीला पूर आल्यानं 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला... काजळी नदीला पूर आल्यानं 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला... लांजा - चांदेराई - रत्नागिरी मार्ग पूर्ण ठप्प.. रस्त्यावर पाणीच पाणी...

कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर परिसरात कल्याण खाडीचे पाणी शिरले, घरं पाण्याखाली,नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

कल्याण पश्चिमेकडील रेतीबंदर परिसरात कल्याण खाडीचे पाणी शिरले, घरं पाण्याखाली,नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

कसारा घाटात अडकलेली अमृतसर एक्स्प्रेस कल्याण दिशेने रवाना

कसारा घाटात अडकलेली अमृतसर एक्स्प्रेस कल्याण दिशेने रवाना करण्यात आली 

नाशिकहून मुंबईकडे जाणारी पंचवटी राज्य राणी एक्स्प्रेस रद्द

नाशिकहून मुंबई कडे जाणारी पंचवटी राज्य राणी एक्स्प्रेस रद्द, इतर गाड्यांचे वेळापत्रक ही कोलमडले

रायगड : पाली येथील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

रायगड : पाली येथील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ.. पाली - खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरुन पाणी...दोन्ही बाजूची वाहतूक पोलिसांकडून बंद

उल्हास नदी ओव्हर फ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर, बदलापूर-कर्जत वाहतूक बंद

चार दिवसांपासून होत असलेल्या संतप्त धार पावसामुळे उल्हास नदी ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे, उल्हास नदी ओव्हर फ्लो झाल्याने नदीचा पाणी बदलापूर पश्चिम भागात शिरलं आहे. तसेच पूर्वेकडील बदलापूर कर्जत महामार्गावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे.

कृष्णा नदीला पूर आल्यामुळे साताऱ्यातील संगम माऊलीतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली

कृष्णा नदीला पूर आल्यामुळे संगम माऊलीतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. मृत करोना बाधितांवर विधी करण्याचे ठिकाण असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासकीय यंत्रणे समोर मोठं संकट उभं राहिलं आहे. बाधितांना जाळण्यासाठी ठेवण्यात आलेली लाकडेही पाण्यातून वाहून जाऊ लागली आहेत.

रामानंदनगर परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले

Kolhapur Rain Update :  रामानंदनगर परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले,


पावसाचा जोर रात्री वाढल्यामुळे इथल्या भागामध्ये पाणी शिरले असून अनेक नागरिक घरांमध्ये अडकून पडले आहेत ,


या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा याठिकाणी दाखल झाली नसल्याने हे सगळे नागरिक या यंत्रणेच्या प्रतीक्षेत आहेत,

कृष्णा नदीला पूर आल्यामुळे संगम माऊलीतील स्मशानभूमी पाण्याखाली 

कृष्णा नदीला पूर आल्यामुळे संगम माऊलीतील स्मशानभूमी पाण्याखाली, 


मृत कोरोना बाधितांवर विधी करण्याचे ठिकाण पाण्यात , स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासकीय यंत्रणे समोर मोठं संकट 


बाधितांना जाळण्यासाठी लाकडेही जाऊ लागली पाण्यातून वाहून

अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक वाहून गेले,महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली, अडकलेल्या प्रवाशांना बसने कसारा आणि इतर ठिकाणी आणणार

इगतपुरी इथे अडकलेल्या प्रवाश्यांना बस ने कसारा आणि इतर ठिकाणी आणणार आहेत.  घाटात 3 ठिकाणी मोठे दगड पडले आहेत.  अनेक ठिकाणी ट्रॅक 20 मीटर पेक्षा जास्त वाहून गेलेत, तीच परिस्थिती भोर घाटात आहे, लोणावळा, खंडाळा घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, ओव्हरहेड वायर लोंबकळत आहेत, ट्रॅक गायब झालेत, कर्जत जवळ 15 मीटर ट्रॅक वाहून गेलाय, भिवूपुरी जवळ ट्रॅक वाहून गेलंय, 


 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोहेली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी 

कालच्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहेली येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र  व उद्यचन केंद्रात नदीचे पाणी  शिरले. परिणामी आज शहाड आंबिवली टिटवाळा ,खडकपाडा  परिसरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे तर मोहेली उद्यचन केंद्र बंद असल्यामुळे डोंबिवली पूर्व-पश्चिमचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे .

मुसळधार पावसामुळं कल्याणचं एपीएमसी मार्केट पाण्याखाली

कल्याण : कल्याणचं एपीएमसी मार्केट पाण्याखाली गेलं आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळं, फुलं आणि भाजीपाला आवार पाण्यात गेला आहे. कल्याण खाडीचे पाणी बाजार आवारात शिरलं आहे. 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. देवगड तालुक्यातील कोर्ले बाणेवाडी येथे मातीचे घर दुसऱ्या घरावर कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 

यवतमाळच्या पुसद तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस, नाल्याना पूर

यवतमाळ : पुसद तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस ब्राम्हणगाव (शामपूर) भागात मोठा नाला आहे. त्याला पूर आल्यानं नाल्या काठच्या घरात घरात पाणी शिरले. काही शेतातसुध्दा पाणी शिरलं. या दोन गावांच्या मधोमध असलेल्या पुलावरून पाणी तसेच जिल्ह्याच्या उमरखेड पुसद रोडवरील दहागाव जवळील नाला ओसंडून वाहत आहे. रात्री उमरखेड आणि पुसद तालुक्यात जोरदार पाऊस असल्याने नाल्याना पूर आला आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मोहेली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी, पाणी पुरवठा बंद 

कालच्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. मोहेली येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि उदंच्चन केंद्रात नदीचे पाणी शिरले. परिणामी आज शहाड आंबिवली टिटवाळा, खडकपाडा  परिसरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे. तर मोहेली उदंच्चन केंद्र बंद असल्यामुळे डोंबिवली पूर्व पश्चिमचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे.

महाड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. शहरातील शिवाजी चौक आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचल्याने या ठिकाणच्या सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे.


 

कोल्हापूर जिल्हासाठी एनडीआरएफच्या 2 टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना 

कोल्हापूर जिल्हासाठी एनडीआरएफच्या 2 टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना ,


एनडीआरएफच्या एका टीममध्ये 25 जवान,


पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने टीम दाखल

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणच्या वशिष्टीपुलाला पाणी लागलं असून वशिष्टीपूल वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. महामार्गावर काही ठिकाणी पाणीच पाणी झालं असून त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. 

परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला

परभणी जिल्ह्यात काल सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने ओढे ,नाले, नद्या ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोअर दुधना प्रकल्प 84% भरल्याने प्रकल्पाच्या 12  दरवाज्यांमधून 12192 क्युसेकने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील मानवतच्या सावंगी मगर, सेलूतील साळेगाव-हातनूर पुलावरुन पाणी जात असल्याने रायपुर, हातनुर, वालुर साळेगाव, निपाणी टाकळी येथे कसूरा नदीवरील पुलावरुन पाणी जात असल्याने परभणीचा संपर्क तुटलाय आहे.सध्याही


 

उल्हास नदीच्या पुलाला पाणी लागलं

कर्जत आणि दहवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीवर पुलाला पाणी लागलं. रात्रभर मुसळधार पाऊस चालू होता. त्यामुळे ओसवाल नगर, इंदिरा नगर पाण्याखाली गेली आहेत. जवळपास पहिल्या मजल्याला पाणी लागलं होतं. दहवली गावातील गावकरी रात्रभर जागे आहेत. अनेक चारचाकी, दुचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार 1989 ला अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती.

सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत, अनेक सखल भागांत पाणीच पाणी

भिवंडी : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भागात सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्येच भिवंडी शहरातील तसेच ग्रामीण भागातील हजारों घरात पानी शिरलं आहे. शजरातील तीन बत्ती भाजी मार्केट, म्हाडा कॉलनी, शेलार नदी नाका बंदर मोहल्ला, ईदगाह , कारीवली, तांडेल मोहल्ला,मेट्रो हॉटेल, मिटपाडा, पडघा, महापोली इत्यादी परिसरात पावसाचे पानी शिरले आहे. रात्रीच्या साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरले आहे व नागरिकांनी स्वतः आपल्या लहान मुलांना व इतर नातेवाईकांचा जीव वाचून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जात आहे तर अनेक जण आपला जीव वाचवल्यासाठी इमारतीच्या टेरेसवर चढलेत. घरातील संपूर्ण वस्तू व रेशन गहू तांदूळ व जीवनाश्यक वस्तू या पाण्यात भिजल्याने नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ येणार आहे.शासनाने या नागरिकांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

मुंबईसह लगतच्या उपनगरांत पावसाचा जोर वाढला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई लगतच्या उपनरांत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला आहे. मध्ये रेल्वेवरील कसारा बाजूच्या ट्रेन टिटवाळ्यापर्यंत सुरु असून कर्जतच्या गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु आहेत. या भागांत पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ वाहून गेलेत, तर काही ठिकाणी दरड कोसळली आहे. 


मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून आजसाठी इम्पॅक्ट वॉर्निंग

Mumbai Rains : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून 21 जुलै रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी इम्पॅक्ट वॉर्निंग प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये हवामान विभागाकडून फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीची शक्यता, कमी वेळात अधिक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीला अडथळा, सोबतच जुन्या इमारतींना धोका असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

कोल्हापूरमधील कळे परिसरामध्ये मुसळधार पाऊस

कोल्हापूरमधील कळे परिसरामध्ये मुसळधार पाऊस, जांभळी व कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पोहाळे ते बाजारभोगावकडे जाणाऱ्या ओढ्यावर पुराचे पाणी आल्याने अनुसकुराकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद

अकोला-बाळापूरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर व्याळा आणि रिधोरादरम्यान रस्त्यावर दोन फूट पाणी

अकोला-बाळापूरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर व्याळा आणि रिधोरादरम्यान रस्त्यावर दोन फूट पाणी, रस्त्यावरील वाहतूक ठप्प, रिधोरानजीकच्या प्रसिद्ध कलकत्ता धाब्यात पाणी शिरलं. धाब्यात तीन ते चार फुट पाणी

कोल्हापूर : गगनबावडा ते कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे पाणी साचण्यास सुरुवात, रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर : गगनबावडा ते कोल्हापूर रोडवर मांडुकली येथे पाणी साचण्यास सुरुवात, पावसाचा जोर कायम, कुंभी धरणातून 420 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कोल्हापूर- गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद 

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, त्र्यंंबकेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर पाणी साचलं

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, त्र्यंंबकेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर पाणी साचलं

रायगड : महाडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ

महाडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती, सावित्री आणि काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ, महाड शहर, बिरवाडी, महाड एमआयडीसी परिसरात पुरसदृश्य परीस्थिती, महाड शहरातील बाजारपेठेत पाणी शिरले

नांदेड: मुसळधार पावसामुळे भोकर दिवशी रोडवरील पर्यायी पूल गेला वाहून, 15 गावांशी संपर्क तुटला

नांदेड: मुसळधार पावसामुळे भोकर दिवशी रोडवरील पर्यायी पूल गेला वाहून,पूल वाहून गेल्यामुळे गारगोटवाडी, दिवशी, नांदा गावा सह पंधरा गावांचा संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या धोक्याची पातळी गाठत असून काही नद्यांच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. वैतरणा नदीला आलेल्या पुरामुळे मनोर पालघर रस्त्यावर पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

दोन दिवसांच्या जोरदार पावसानंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सकाळपासून थोडी उसंत घेतली आहे असं वाटतं असताना आता पुन्हा एकदा, महाड, लोणेरे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अशीच परिस्थिती आज आणि उद्या राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हवामान खात्याच्या वतीने जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. सतत असाच पाऊस राहिला तर नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन गावांमध्ये पाणी शिरू शकतं  त्यामुळे त्यांच्यासाठी देखील जिल्हा प्रशासनाने नजीकच्या ठिकणी व्यवस्था केली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक भले मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकींचे नुकसान

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात एक भले मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने एक मोठी दुर्घटना टळली आहे. नाहीतर ज्या जागी हे झाड कोसळले त्या जागी नेहमीच कर्मचाऱ्यांची वर्दळ बघायला मिळते. हे झाड कोसळल्याने संरक्षक भिंत देखील कोसळून आता धोकादायक बनली आहे. पाऊस आणि प्रचंड वारा यामुळे आज सकाळपासून ठाण्यात पंधरा ठिकाणी झाडे कोसळली आहेत. 

सातारा-  कोयना पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला

सातारा-  कोयना पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला, पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर धरणाचे दरवाजे आडीच फुटाने उघडले, धरणातून प्रती सेकंद 1 हजार 467 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, गोकुळ पुल जाणार काही वेळात पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या सरींचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या सरींचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात सरींवर पाऊस बरसत आहे. सध्या सुमद्राला उधाण आलं असून समुद्र खवळल्याचं चित्र दिसून येत आहे.समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनारपट्टी भागाला काही धोका नसला तरी नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.  जिल्ह्यात 1 जून ते 20 जुलै या कालावधीत 2042 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. सध्याचं वातावरण पाहता जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

भिवंडीत पावसाची संततधार सुरू, अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये साचलं पाणी

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे तर भिवंडी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर जर कायम राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आले आहे.

कोल्हापूर : कासारी नदी  वारण मळी येथे पाणी आले, करंज, फेन, अणुस्कुरा मांजरे येथे जाणारा रस्ता बंद, पाण्याची पातळी 3 फुट

कोल्हापूर : कासारी नदी  वारण मळी येथे पाणी आले, करंज, फेन, अणुस्कुरा मांजरे येथे जाणारा रस्ता बंद, पाण्याची पातळी 3 फुट

कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासूनच पावसाची ये-जा सुरु होती. दुपारी बारानंतर पावसाचा जोर वाढला गेल्या दीड तासपासून कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणमधील आडवली गावात देखील रस्तावर जवळपास गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. या मुसळधार पावसामुळे शहरातील इतर सखल भागात देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

सातारा जिल्ह्यात सर्वत्र तुफान पाऊस

 सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं जोर धरलाय. आज आणि उद्या सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासून सातारा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय. कोयना, महाबळेश्वर परिसरात मुसळधार सरींची बरसात होतेय. 

ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार, उपवन तलाव काठोकाठ भरलं

ठाण्यात सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे ठाण्याचा प्रसिद्ध उपवन तलाव काठोकाठ भरलाय. त्यामुळे आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास हा तलाव ओसंडून वाहू लागेल. दरम्यान, प्रशासनाकडून ठाणेकरांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन करण्यात आलंय. आणि त्याला ठाणेकरांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.

मुंबईसाठी पुढचे काही तास महत्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्यानं वर्तलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावलीय. त्यात मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये दुपारी १ पर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुलुंड, भांडुप, ठाणे, कल्याण, नवी मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान सकाळपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार सरी बरसताहेत. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसत असल्यानं चेंबूरमधील सखल भागात पावसाचं पाणी साचलंय.. त्यातच सकाळी १० च्या सुमारास समुद्रालाही उधाण आलं. दरम्यान मुंबईतल्या काही भागात ावसाचा जोर वाढला असला तरी लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे..  तरी, हवामान खात्याकडून आज मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कळंबा तलाव ओवर फ्लो

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर शहराच्या जवळ असलेला कळंबा तलाव ओवर फ्लो झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे  तलावांमधील पाणी पातळी वाढत आहे. कळंबा तलावाची आकर्षक दृश्य पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. 

मुंबई महानगरपालिकेत कंत्राट देत असताना वाझेगिरी सुरू - अमित साटम

लवकरात लवकर हायवे कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, भाजप आमदार अमित साटम यांची मागणी. मुंबईत १६ ॲाक्सिजन प्लान्ट उभे करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ८४ कोटींच कंत्राट हायवे कंसस्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. ३० दिवसांमध्ये ॲाक्सिजन प्लान्ट उभे करा असं करार पत्रात लिहल आहे मात्र ३२ दिवस उलटून देखील अजून ॲाक्सिजन प्लान्टच काम पूर्ण झालेल नाही.त्याव्यतिरिक्त याच हायव्हे कंसस्ट्रकशन कंपनीला ३२० कोटी रूपयाचं कंत्राट पुन्हा एकदा देण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेत कोणती “पेंग्विन गॅंग” सक्रिय आहे आणि ती वाझेगिरी करत आहे उघड झाल पाहीजे.राणीच्या बागेत पेंग्विन इनक्लोजर  तयार करण्यावरून हायवे कंस्ट्रक्शन कंपनीवर ताशेरे ओढण्यात आले होते गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही या कंपनीला ॲाक्सिजन प्लान्टच काम कस देण्यात आलं. ताबडतोब हे कंत्राट रद्द केल पाहीजे, असं साटम यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे... काल संध्याकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे... त्यामुळे पंचगंगा नदी बरोबर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.. पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे... सध्या पंचगंगेची पाणीपातळी 29.10 इंच इतकी आहे...त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत....

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरांत सकाळपासून पावसाची संततधार

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागांत मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. 

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

देशभरात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या मुंबई केंद्रानुसार, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आले आहे. कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम, त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस अपेक्षित, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain : पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यात पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत. 


पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. सोबतच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जुलै आणि 31 जुलै रोजी ह्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 70-200 मिमीपर्यंतचा पाऊस अपेक्षित असेल. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी घाट माथ्यांकरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिथे 70 ते 200 मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 


महापुरात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकार पाच लाख तर केंद्र सरकार दोन लाख रुपये मदत देणार: अजित पवार
महापुरात मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार तर केंद्र सरकार 2 लाख मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावावर सात बारा असेल तर त्यांच्या नातेवाईकांना गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु असलेल्या योजनेतून आणखी दोन लाख मिळणार असल्यांचही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.


राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटणार, पूरग्रस्तांसाठी शरद पवारांची मोठी घोषणा
अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी शरद पवरांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.