Mumbai Local Updates : मुंबई (Mumbai) आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत कोसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोसळधारेमुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस पडतोय. तसेच, पावसाच्या संततधारेमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत रुळांवर काही प्रमाणात पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. पावसामुळे ठाणे रेल्वे स्टेशनामध्ये पाणी, मात्र वाहतुकीवर परिणाम नाही. 


कालपासून ठाणे शहरात देखील प्रचंड पाऊस बरसत आहे. मुलीला पावसामुळे दरवर्षी ज्या ठिकाणी हमखास पाणी साचते अशा वंदना सिनेमा चौकात आणि साचलेले बघायला मिळत आहे. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सध्या कमी आहे. त्यामुळे अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास भरतीच्या वेळेस पाण्याची पातळी वाढून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ शकतो. 




मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी 


आता समुद्रकिनारी राहणाऱ्यांसाठी किंवा फिरायला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. आजपासून पुढील साहा दिवस समुद्राला उधाण येणार असून राज्याच्या समुद्र किनाऱ्यांवर साडेचार मीटर्स उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. रा्जयात पावसाचा जोर कायम आहे आणि अशातच आता किनारपट्टीवरही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. समुद्र खवळलेला असल्यानं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 


दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं अजूनही विश्रांती घेतली नाहीये. आज पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पावसामुळे राज्यभर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होतेय. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग तासागणिक वाढवला जातोय. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. तिकडचे लोणावळ्यात पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन प्रशासनानं संध्याकाळी 5 नंतर भुशी धरणाकडे जाण्यास बंदी घातली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यानं नदीकाठी नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Rains: पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन