Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होणाऱ्या अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज पहाटे मुंबईच्या दिशेनं येणारी 6 वाहनं बोरघाटात एकमेकांना धडकली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. त्यापैकी तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजत आहे. जखमींवर नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात चार जण जागीच दगावले आहेत. तर आठजण जखमी झाले आहेत. अपघातात सहा वाहनांनी एकमेकांना धडक दिली. एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक दिली. स्विफ्ट कार तिच्यापुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. स्विफ्ट कारनं दिलेल्या धडकेमुळं टेम्पो त्याच्यापुढे जात असलेल्या कारवर जाऊन आदळला. या कारच्यापुढे आणखी एक कंटेनर जात होता, ही कार त्या कंटेनरवर जाऊन आदळली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या वाहनांचा बोरघाटात भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Shirdi News : साईनगरीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी; दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून रेकी केल्याची कबुली
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
- Kokan Tourism : तळकोकणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन, अत्याधुनिक स्कुबा बोटचा घेता येणार आनंद
- OBC Reservation: गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार; संभाजीराजेंची घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha