मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह एमएमआर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. याचा रस्ते वाहतुकीसह आणि लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानं कोविड हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरु करा अशा सूचना पालिका आयुक्तांनी तर मंत्रालयासह सरकारी कार्यालयं, बँका, कोर्ट काही काळ अंधारात गेल्याचं चित्र होतं. अनेक ठिकाणी यामुळं पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत. त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले.
मुंबई अंधारात! वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबई, ठाणे परिसर प्रभावित; लोकल ठप्प, विद्यार्थी चिंतेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर सकाळी 11 ते 12 या वेळेत होते. मात्र मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य होणार नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांची परत परीक्षा घेतली जाईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. आज वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार असल्याचं विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम
बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला. मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नवी मुंबईत देखील वाशी, नेरुळ, खारघर, पनवेल या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाले. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला ते सीएसटी लोकल ठप्प झाली होती. वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे.