Mumbai Power Outage LIVE Update | वीज पुरवठा खंडितप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2020 01:21 PM
संपूर्ण मुंबईची बत्ती गुल होण्याची इतिहासातील पहिलीच वेळ
मुंबईत वीज पुरवठा खंडित होणं दुर्भाग्यपूर्ण, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
वीज पुरवठा खंडितप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश
मुंबई हळुहळु पुर्वपदावर,

मुंबई आणि मुंबई उपनगरात वीज पुरवठा सुरळीत सुरु

रेल्वे तसेच सिग्नल सेवाही हळुहळु सुरळीत होत आहे

शासकीय कार्यालयांमध्ये वीज पुरवठा सुरु
पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सतर्कता बाळगावी- मुख्यमंत्री
अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, उर्जामंत्री नितीन राऊत
हार्बर रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी काम सुरु आहे, प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरु नये, सेंट्रल रेल्वे पीआरओ शिवाजी सुतार यांचं आवाहन
तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सुरू
अडीच तासांच्या खोळंब्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंते आणि कर्मचाऱ्यांचं काम युद्धपातळीवर सुरु; रुग्णालय आणि रेल्वे सुरु करण्याला प्राधान्य : ऊर्जामंत्री नितीन राऊत
सुमारे अडीच तासांनंतर दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वीजपुरवठा सुरु
लवकरात लवकर वीज पुरवठा पुर्ववत होणार, उर्जामंत्री नितीन राऊत
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या
रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले
उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत
नाहूर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, पनवेल, नेरुळ, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात वीज पुरवठा पूर्ववत
मध्य रेल्वे हळू हळू पूर्वपदावर...सायनहून डोंबिवलीच्या दिशेने पहिली लोकल रवाना
महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली. त्यामुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कॅपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत . एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल.. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ट्वीटवरुन माहिती

वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युध्दपातळीवर, आरोग्यमंत्र्याची माहिती
कल्याण, डोंबिवली, कळवा, ठाणे या भागात काही ठिकाणी वीज पुरवठा सुरू
हार्बर रेल्वे सुरू,पनवेल-सीएसएमटी लोकलसेवा पूर्वपदावर
ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करू, उर्जामंत्री नितीन राऊत
एक तासाच्या वर लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा खोळंबा
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखील प्रवासी अडकले आहेत.
अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता

सर्व महत्वाच्या दवाखान्यात पर्यायी व्यवस्था आहे,
जनरेटर आहेत.
बिघाड दुरुस्त होईपर्यंत जनरेटरचा वीज पुरवठा पुरेसा होईल.
आणखीही आवश्यक ती पाऊलं उचलत आहोत
सध्या चिंतेची बाब नाही.
- डॉ. संजय ओक, कोविड टास्क प्रमुख
महापारेषणच्या बिघाडामुळे महावितरण पुढीलप्रमाणे प्रभावित

30 EHV केंद्र
150 सबस्टेशन/स्वीचिंग स्टेशन
1500 फिडर
सुमारे 20 लाख ग्राहक
रेल्वेचा विद्युत पुरवठा युद्धपातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न - महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
कळव्यामध्ये समस्या, पडघा-कळवा इथली ट्रिप झालेली लाईन सुरळीत, अंदाजे 30 मिनीटात बिघाडात दुरुस्ती, पुढच्या अर्ध्या तासात वीज मिळेल

पार्श्वभूमी

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली असून. बेस्ट, अदानी, एमएसइबीच्या भागात वीज नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून प्रवासी अडकले आहेत. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसत आहे.


महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली आहे. तर आज बहुतेक मुलांच्या ऑनलाईन परीक्षा असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. लाईट गेल्यामुळे अनेक ठिकाणची लोकल सेवा देखील खंडीत झाली आहे.

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाल्याची माहिती समजते आहे. मुंबऔओई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, ब्रांद्रा, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला आहे.

वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परिक्षा आहेत. त्यामुळे वीज गेल्यानं पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परिक्षेचे पेपर सकळी 11 ते 12 या वेळेत आहेत. मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देणं शक्य होणार नाही, त्यांनी चिंता करू नये त्यांची परत परीक्षा घेतली जाईल, असं विद्यापीठाकडून संगण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइलवर परीक्षा देता येत असेल त्यांनी पेपर द्यावा अन्यथा पेपर नंतर घेतला जाईल. त्याबाबत विद्यापीठ लवकरच माहिती देईल. आज दुपारी 1ते 2 दरम्यान सुद्धा पेपर आहेत. पण तोपर्यंत वीज येईल का? त्याबाबत बघून पुढचा निर्णय घेऊ असेही विद्यापीठाने सांगितलं आहे. विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला ते सीएसटी लोकल ठप्प झालीय. अर्ध्या तासांपासून प्रवाशी अडकले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.