Mumbai Potholes : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आता या खड्ड्यांचा विरोध दर्शवण्यासाठी मनसेने आगळा वेगळा मार्ग शोधलाय. होय, मुंबईतील खड्ड्यांविरोधात मनसेने अनोखी स्पर्धां आयोजित केली आहे. मनसेनं चक्क या खड्ड्यांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये आता अनेक युवा खेळाडू आपलं कौशल्य दाखवतील. पण या अनोख्या स्पर्धाद्वारे मनसेनं बीएमसी निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जातेय. 


मनसेने आयोजित केलेल्या स्पर्धेत युवा खेळाडू भल्यामोठ्या खोलउथळ खड्ड्यांवर आपला खेळ सादर करणार आहेत. लांब उंडी, ट्रीपल उडी, स्लो वाँक, वाँक रेस, बँलेंन्स उडी इत्यादी खेळांची ही स्पर्धा रंगणार आहे. खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना महापालिका खड्डा चषकाने गौरविण्यात येणार आहे. मनसेच्या या स्पर्धेची सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  


महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्देचं ठिकाण हे चँपियनशिप मैदान-नारी सेवा सदन रोड, हिमालय सोसायटी, होमगार्ड जवळ आहे. रविवारी सकाळी 11 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.  मनसेनं मुंबईतील प्रचाराला सुरुवात केली आहे. काही दिवसांमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्ष यासाठी तयारीला लागला आहे. सत्ताधारी शिवसेनेला खाली खेचण्यासाठी इतर पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेने आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करत शिवसेनाला घेरण्याचा प्रयत्न केलाय.


हेही वाचा : Mumbai Potholes : 2 वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार, इकबाल सिंह चहल यांचा विश्वास


मुंबई खड्डे अँथलेटिक्स चँपियनशिप 2022 रविवारी होणार आहे. मुंबईच्या भल्यामोठ्या-खोलउथळ खड्ड्यांवर युवा खेळाडू आपला खेळ सादर करणार आहेत. लांब उंडी, ट्रीपल उडी, स्लो वाँक, वाँक रेस, बँलेंन्स उडी इत्यादी खेळांचे स्पर्धा रंगणार आहे. खेळात सहभागी होणार्या खेळाडुंना BMC महापालिका खड्डा चषकाने गौरविण्यात येणार आहे.