Mumbai Pollution: गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची मोठी चर्चा सुरु असून वाढतं बांधकाम,गंभीर श्रंणीकडे झुकलेली हवेची गुणवत्ता, वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेचे हात अपूरे पडत असल्याचंच समोर येत आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई महापालिकेकडे फक्त एकच व्हॅन आहे आणि ती ही नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या प्रदुषण नियंत्रणासाठी व्यवस्थाच कूचकामी ठरत असल्याची चर्चा आहे. मुंबई (Mumbai) शहरावर धूसर हवेच सावट आल्याने मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक राजधानीचं स्वास्थ्य आता बिघडू लागलं आहे का? असाही प्रश्न निर्माण होतोय. कारण, मुंबईत मागच्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता बिघडली आहे. याचा फटका थेट मुंबईकरांना बसला आहे. मुंबईत पायाभूत सुविधा, नवे विकास प्रकल्पाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यातून तयार होणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. याच जोडीला वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म कण असतात. या कारणांमुळं मुंबईच्या हवेवर परिणाम होत आहे.
मुंबईच्या दैनंदिन हवेच्या गुणवत्ता अहवालानुसार, रविवारी मुंबईचा AQI 150 पर्यंत पोहोचला आहे. जो गंभीर श्रेणीतील आहे. केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या मार्गदर्शक आकडेवारीनुसार, 0-50 या श्रेणीतील AQI चांगला समजला जातो. 52-100 हा समाधानकारक श्रेणीत गणला जातो तर त्याहून अधिक गंभीर श्रेणीत मोजला जातो.
मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे हात अपुरे
पालिकेने नव्या चार मोबाईल व्हॅन खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे, पण अद्याप कोणताही हिरवा झेंडा त्याला दाखविला नाही आहे.तसेच हवेची गुणवत्ता तपासासाठी आता महापालिकेजवळ असलेल्या 28 सनियंत्रणावर अवलंबून आहे यात आणखी 5 सनियंत्रण घेण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे.मुंबईची परिस्थिती आणि परीघ पाहता 70 सनियंत्रण असणे गरजेचं आहे.बांधकाम साईटवर हवेची गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा व्यावसायिकांनी स्वतः बसवावी अश्या सूचना व्यवसायिकांना देण्यात आल्या आहेत. तर अधिकाऱ्यांनी जाऊन ती पाहावी अशी निर्देश नुकतेच काढले आहेत. पण त्याचाही आभास असल्याची माहिती समोर आली आहे.
बांधकाम साइट्सवर प्रदूषण नियंत्रणाचा फोकस
मुंबईतील बांधकाम साइट्स प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत मानले जातात. यासाठी महापालिकेने व्यावसायिकांना हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी आवश्यक यंत्रणा स्वतः बसवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी या यंत्रणांची तपासणी करावी, असेही निर्देश दिले आहेत. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होत आहे, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. मुंबईत गारवा वाढण्यास सुरु झाली असली तरी हवेचा दर्जा घसरला आहे. वायू प्रदुषणात मोठी वाढ झाली असून वाहनांचे उत्सर्जन, बांधकांमाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ, स्थानिक हवामान अशा सगळ्याच बाबींचा एकत्रित परिणाम मुंबईच्या हवामानावर होत असून बोरिवली भायखळा भागातील हवेचा स्तर घसरल्याने या दोन्ही भागातील बांधकामे बंद करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय? वाढत्या प्रदूषणाचा आर्थिक राजधानीला फटका, आरोग्यावर परिणाम