मुंबई : संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आवश्यक ती परवानगी न घेतल्यामुळे मुंबई पोलीस आयोजकांवर गुन्हा दाखल करणार आहेत.


मुंबईत आज प्रजासत्ताकदिनानिमित्त विरोधकांनी संविधान बचाव काढली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयू नेते शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला.

मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरु झालेली रॅली गेट वे ऑफ इंडियावर दाखल झाली. महत्वाचं म्हणजे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनाही या रॅलीमध्ये सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होत.

या रॅलीच्या समारोपावेळी कोणतीही सभा अथवा घोषणा दिल्या जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीची सांगता होणार आहे.