मुंबईत आता एक, दोन नाही तर आठ पोलिस स्टेशनचं इन्चार्ज महिलांना बनवण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिलं आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या आठ महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
कोणाला कोणत्या पोलिस स्टेशनची जबाबदारी?
मुंबई पोलिस आयुक्तांच्या अतिसंवेदनशील पोलिस ठाण्याची जबाबदारी अलका मांडवी यांना देण्यात आली. त्या सध्या एअरपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृदुला लाड यांच्याकडे सायन पोलिस स्टेशन सोपवण्यात आलं आहे.
तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलिस स्टेशनच्या इनचार्ज असतील.
याशिवाय ज्योत्स्ना रसम ह्या गोरेगावच्या वनराई पोलिस स्टेशन इनचार्ज म्हणून काम पाहणार आहेत.
रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलिस स्टेशन, विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलिस स्टेशन तर कल्पना गडेकर यांच्याकडे बीकेसी पोलिस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर रश्मी जाधव ह्या कफ परेड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक आहेत. हे तेच ठिकाण आहे, जिथून कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत दाखल झाले होते.
अलका मांडवी - एअरपोर्ट पोलिस स्टेशन
मृदुला लाड - सायन पोलिस स्टेशन
लता शिरसाट - सहार पोलिस स्टेशन
ज्योत्स्ना रसम - वनराई पोलिस स्टेशन
रोहिणी काळे - पंतनगर पोलिस स्टेशन
विद्यालक्ष्मी हिरेमठ - आरे पोलिस स्टेशन
कल्पना गडेकर - बीकेसी पोलिस स्टेशन
रश्मी जाधव - कप परेड पोलिस स्टेशन
मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन यांची माहिती दिली आहे. मुंबईकरांनी पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.