ठाणे पालिका आयुक्तांना मोठा दिलासा, ‘पोक्सो’ची याचिका निकाली
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
02 Apr 2018 04:21 PM (IST)
जयस्वाल यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे.
NEXT
PREV
मुंबई: ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवणारे सनदी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला.
जयस्वाल यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे. पीडीत मुलगी आणि तिच्या आईनं ठाणे पोलिसांनी पोक्सो अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात साऱ्या आरोपांना नकार दिला.
एसीपी पद्मजा चव्हाण यांना त्या 15 वर्षीय मुलीचा जबाब नोंदवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते.
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर या याचिकेमार्फत करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ता विक्रांत कर्णिक यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली.
न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
या याचिकेतून जयस्वाल यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. सदर मुलीकडून रात्री उशिरापर्यंत जयस्वाल बॉडी मसाज घेत असत, असा उल्लेख या याचिकेत करण्यात आला.
याबाबत सदर मुलीच्या आईने मानपाडा पोलीस स्टेशन तसेच ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही. याउलट पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळेच जयस्वाल यांनी सूड भावनेने तक्रारदार महिला राहत असलेली झोपडपट्टी तोडली, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
त्यामुळे या घटनेची दखल घेऊन संजीव जयस्वाल यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद व्हावी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -