Mumbai Police Summons to Pooja Dadlani : शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. पूजा ददलानीनं प्रकृतीची सबब देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागून घेतला आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीला शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. याप्रकरणी सध्या एनसीबी आणि मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. एनसीबीची एसआयटीदेखील याप्रकरणाची चौकशी करत आहे. 


एनसीबीचं एक पथक मुंबईतील लोअर परेलमधील फिनिक्स मॉल परिसरात पोहचलं आहे. याच परिसरात पूजा दादलानी आणि किरण गोसावी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचं बोलणं झाल्याचा संशय आहे. याआधी शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानींची निळी मर्सिडीज इथे मुंबई पोलिसांना सीसीटीव्हीतून दिसली होती. त्या गाडीतील एका महिलेनं दुसऱ्या कारमधील व्यक्तींशी चर्चा केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे. आता एनसीबीकडूनही याचा तपास केला जात आहे. एनसीबीचं हेच तपास पथक पुढे क्रूझ टर्मिनल वर जाऊन आणखी काही लोकांची चौकशी करणार असल्याचं कळतं आहे. 


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचं SIT पथक अॅक्शन मोडमध्ये


मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे. रविवारी प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन खान एनसीबी चौकशीला गौरहजर राहिला. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला आहे. 


प्रभाकर शैलला एनसीबीकडून तपासासाठी समन्स 


एकिकडे एसआयटीनं या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरु केली आहे. क्रूझ प्रकरणातील आर्यन खानला रविवारी एसआयटीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन चौकशीसाठी गैरहजर राहिला. आर्यनची प्रकृती ठिक असेल तर आज आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकतो. 


तर दुसरीकडे, एनसीबीच्या एसआयटीनं क्रूझ ड्रग प्रकरणी रविवारी आरोपी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांचा जबाब नोंदवला. एसआयटी ज्या 6 प्रकरणांचा तपास करत आहे. त्यामध्ये जेवढे आरोपी आहेत, सर्वांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. या 6 प्रकरणांमध्ये आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली, मुंब्रा येथील प्रकरण ज्यामध्ये MD ड्रग्स जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच जोगेश्वरी येथील प्रकरण ज्यामध्ये 1 किलो चरस जप्त करण्यात आलं होतं. 


दरम्यान, या 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे. या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचं नेतृत्व संजय सिंह करत आहेत. या पथकात एक AD, दोन SP, 10 IO आणि JIO आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. एनसीबीचं आणखी एक पथक याच प्रकरणी आपला तपास पुढे सुरु करणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :