Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप काल मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आज पुन्हा समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी आरोपांचा 'सिलसिला' कायम ठेवला आहे. 


आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप 


नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे.  समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नवाब मलिक यांनी म्हटलं की, ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. 






नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...


काल पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले होते. 


ड्रग्ज प्रकरणात मंत्र्यांना अडकवण्याचा प्लॅन? नवाब मलिकांचा दावा, 'ते' मंत्री कोण


नवाब मलिक यांनी  म्हटलं होतं की, क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात आली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटींच्या मुलांना पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात त्यांना अडकवायचं? असं मलिक यांनी म्हटलं होतं. 


नवाब मलिक यांनी  म्हटलं होतं की,  मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. ड्रग्जच्या नावावर जी हजारो कोटी रुपयांची जी वसुली होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे. माझ्या जावयाने म्हटलं आहे की जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी हरकत नाही, मात्र यांना सोडू नका, असं मलिक म्हणाले होते.