Mumbai Police : अवघ्या काही तासांत नवीन वर्षाची सुरुवात (Happy New Year 2023) होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस देखील सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांनी मुंबईकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) दल तैनात असल्याचेही त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


पाहा व्हिडीओ : 






पोलीस आयुक्त बृह्नमुंबई यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुढे म्हटले आहे की, "आज 31 डिसेंबर आहे. आपण नवीन वर्षाच्या स्वागताची आणि यावर्षीच्या सांगतेची खूप तयारी करत असाल. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. संपूर्ण मुंबई पोलीस दल हे आपल्या सुरक्षेसाठी मुंबईत रस्त्यांवर सगळीकडे तैनात असेल. आमचं कार्य हेच आमचं सेलिब्रेशन राहणार आहे. तुमच्याकरता आम्ही सदैव तत्पर आहोत. तुम्ही सर्वजण आपली स्वत:ची काळजी घ्या. सुरक्षित राहा आणि आनंद साजरा करा." अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


New Year Celebration Mumbai Traffic: नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल; वाचा अधिक माहिती