Mumbai Airport : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धमकीचं सत्र सुरुच आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. सोमवारी  अज्ञात व्यक्तीकडून पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) स्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी 24 तासांच्या आत धमकी देणाऱ्या त्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  


मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी रात्री 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) स्फोटाने उडवून देणार, अशी धमकी देण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीन (Indian Mujahideen) या दहशतवादी संघटनेच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळे विमानतळ आणि मुंबई पोलिसांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. तात्काळ याबाबत तपास करण्यात आला अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. 


विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) स्फोटकाने उडवून टाकू, अशी धमकी या माथेफिरूने दिली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असं आपलं नाव सांगितलं होतं. त्यानंतर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला मुंबई परिसरामधून ताब्यात घेतलेलं आहे.  या व्यक्तीने ही धमकी का दिली आहे, त्याचा धमकी मागील उद्देश काय आहे या संदर्भात अधिक चौकशी सहार पोलीस करत आहेत. 


दोहावरुन आलेल्या प्रवाशाकडून विमानतळावर जिवंत काडतुस मिळालं, गुन्हा दाखल


दोहावरुन मुंबईत आलेल्या प्रवाशाकडे जिवंत काडतूस मिळालं आहे. त्या प्रवाशाविरुद्धात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)  स्क्रीनिंगदरम्यान एका प्रवाशाच्या बॅगमध्ये जिवंत काडतूस मिळालं.  विमानतळावरील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चार फेब्रुवारी रोजी दोहावरुन मुंबईला आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगमध्ये जिवंत काडतूस मिळालं. त्या प्रवाशाला केरळच्या कोझीकोडी विमानतळावर जायचं होतं. त्याचं लगेज तपासण्यासाठी लेवल 1 कडे पाठवण्यात आले. त्यावेळी बॅगेज स्क्रिनिंगदरम्यान त्याच्या बॅगमध्ये संशयस्पद वस्तू असल्याचं आढळलं. त्यानंतर त्या बॅगला तपासणीसाठी लेवल 2 कडे पाठवण्यात आले. तिथेही बॅगमध्ये संशयस्पद वस्तू दिसली.. त्यामुळे लेवल 3 अन् लेवल चार मध्ये बॅगला पाठवण्यात आले. त्यावेळी बॅगमध्ये जिवंत काडतूस मिळाली. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यानं सीआयएसएफ आणि सहार पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी फैसल परमबील नावाच्या प्रवाशाच्या विरोधात आर्म्स अॅक्टच्या 25 आणि 3 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.