Shivsena Corporator Yashwant Jadhav : मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा घातला आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे. सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचं पथक दाखल झालं आहे. दरम्यान, य पथकासोबत CISF पथकंही असल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्याचं पाहायला मिळालं होतं. 


पाहा व्हिडीओ : Mumbai यशवंत जाधवाच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेची चौकशी सुरु ABP Majha



कोण आहेत यशवंत जाधव? 



  • यशवंत जाधव यांचा 2002 साली तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचा 2014 साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती.

  • दोन्ही वेळेला अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असताना जाधव दाम्पत्याला संधी मिळू शकली नव्हती. 

  • यशवंत जाधव यांनी आतापर्यंत बाजार समितीचे आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. 

  • आधी गटनेते आणि 2017 साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती. 

  • 2018 साली त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

  • त्यानंतर आतापर्यॅत स्थायी समितीपदावर विराजमान आहेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha