Mumbai on High Alert : केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये आज सकाळी झालेल्या सीरीयल बॉम्ब ब्लास्टचा घटनेनंतर मुंबईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात खाबड हाउस इमारतीमध्ये यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळीही दहशतवाद्यांनी खाबड हाउस इमारतीवरला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर नेहमी या इमारतीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो, मात्र आज केरळमध्ये झालेल्या सीरीयल बॉम्बब्लास्टच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खाबड हाउस इमारतीच्या गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खाबड इमारतीच्या गल्लीमध्ये जाणारा एक-एक गाडीचा आणि नागरिकांचा पोलीस कसून चौकशी करत आहे.


केरळात बॉम्बस्फोट, मुंबईत हायअलर्ट


केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह, पुणे आणि दिल्लीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


केरळ साखळी बॉम्बस्फोटाने हादरलं


आज सकाळी केरळ एका मागोमाग एक साखळी स्फोटांनी हादरलं. केरळमध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट झाला. यहुदी समाजाच्या प्रार्थनास्थळामध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या 35 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


आयईडीमुळे स्फोट, टिफीन बॉक्समध्ये बॉम्ब


रविवारी, 29 ऑक्टोबर केरळमधील कोची कन्व्हेन्शन सेंटरमध्ये यहुदी समाजाच्या प्रार्थना सभेत सीरियल बॉम्बस्फोट झाला. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या बॅटरी, वायर आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये टिफीन बॉक्समध्ये बॉम्ब ठेवून आयईडीच्या साहाय्याने स्फोट घडवण्यात आलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. संवादादरम्यान परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. स्फोटावेळी सुमारे 2500 लोक तिथे उपस्थित होते. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kerala Blast : केरळमध्ये बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती