Mumbai News : दहिसरमध्ये (Dahisar) महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान (Fire Brigade Recruitment) गोंधळ झाला आहे. जास्त उंचीच्या मुलींना बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या मुलींनी दहिसरमध्ये आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. गोंधळ झाल्यामुळं दहिसरमध्ये पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप
जास्त उंचीच्या मुलींना देखील बाहेर काढल्याचा आरोपांवरुन दहिसरमध्ये (Dahisar) महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ झाला आहे. 162 सेमी पेक्षा जास्त उंची असलेल्या मुलींनाही बाहेर काढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या महिलांनी आता आंदोलनाचा (Agitation) पवित्रा घेतला आहे. या महिला उमेदवारांना अडवण्याच्या प्रयत्न सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या मुलींवर एम. एच. बी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.
Fire Brigade Recruitment : विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली दहीसरमध्ये दाखल
दहिसरमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही गटासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महिलांची उंची ही 162 सेंटीमीटर हवी, असा आग्रह इथे धरण्यात आला होता. आज सकाळपासूनच दहिसर येथील अग्निशमन दलाच्या केंद्रावर भरती प्रक्रिया सुरू आहे. सकाळपासूनच या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली दहीसरमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र, मुलींना भरतीसाठी उंची 162 सेंटीमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, 163 किंवा 164 सेंटीमीटर ऊंची असलेल्या उमेदवाराला देखील बाहेर काढले जात असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. त्यामुळं सकाळपासूनच मुलींनी या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळं दहीसर परिसरात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या मुली भर उन्हात आंदोलन करत आहेत.
मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोंधळ झाल्यामुळं दहीसर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 2 बजार मुली दहिसरमध्ये आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेकडून अग्निशमन दलात 910 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. 13 जानेवारीपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्याची आजची म्हणजे 4 फ्रेब्रुवारी ही शेवटची तारीख होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :