BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी 52 हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच 50 हजार कोटीचा आकडा पार केलं. यंदाचं बजेट हे 52 हजार 619 कोटी रुपयांचे आहे. महत्त्वाचं म्हणजे, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. 


6670 कोटींनी बजेट वाढले


मुंबईचे यंदाचे बजेट 6670 कोटी रुपयांनी वाढले आहे. टक्केवारीत ही वाढ 14.52 टक्के इतकी आहे. मागील वर्षीचं (BMC Budget 2022) बजेट हे 45 हजार 949 कोटी रुपये होते.


शिक्षण 


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पात सुरुवातीला शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाचे शिक्षण विभागाचे बजेट 3347 कोटी रूपयांचे आहे.


अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी (BMC Budget Highlights)


• बेस्ट उपक्रमास 1382 कोटी रुपयांची रक्कम कर्ज स्वरुपात देण्यात येणार


• मुंबई पालिकेचे 2023-24 चा अर्थसंकल्पीय अंदाज 52 हजार 619 कोटी रुपयांचा 


• मागच्या वर्षी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प सादर 


• पालिकेकडून पार्किंग ॲप विकसित करण्याचा निर्णय, ज्याद्वारे पार्किंग स्लॉटचे प्री-बुकिंग, ऑनलाईन पेमेंट आणि इतर सुविधांचा लाभ मिळणार


• कोस्टल रोडसाठी 3 हजार 545 कोटी रुपयांची तरतूद, याच आर्थिक वर्षात काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस


• मुंबईकरांना पार्किंग अॅपच्या मदतीने 32 सार्वजनिक पार्किंग लॅाट 91 ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे.


गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण होणार  


• पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकरता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागीदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न


• पालिकेकडून मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करणार


वाढतं प्रदूषण रोखण्यावर विशेष भर


मुंबईतील वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईचं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. 


• सोबतच पालिकेच्या ताफ्याचे ई-वाहन ताफ्यात रुपांतर आणि चार्जिंग सुविधा 


• बेस्टकरता 3 हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार 


• पालिकेच्या जुन्या डिझेल/पेट्रोल गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर 


• कचरा व्यवस्थापनात देखील उपाययोजना करत वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न, याकरीता काही प्रकल्प प्रगतीपथावर 


• नवीन 1 लाख झाडे मुंबईत लावली जाणार 


• अतिप्रदूषित रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करत ग्रीन बफर तयार करणार


बेस्टसाठी अर्थसहाय्य


• अर्थसंकल्पात बेस्टसाठी 1382.28 कोटी रुपये अर्थसहाय्य


• कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद


• गोरेगाव मुलुंड जोडरस्ता 1060 कोटी रुपयांची तरतूद 


• रस्ते सुधारणा 2825.6 कोटी रुपये 


• पुलासाठी 2100 कोटी रुपये 


• पर्जन्यजल वहिनी 2570.65 कोटी रुपये


• सर्वजनिक आरोग्य 1680.19 कोटी रुपये


• शिक्षण विभाग 3347.13 कोटी रुपये 


मुंबई महापालिका सामाजिक उपक्रम 


• महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीयांसाठी भरीव तरतूद 
• महिला बचतगट : 11.65 कोटी रुपये
• महिला अर्थसहाय्य योजना : 100 कोटी रुपये
• दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थसहाय्य 25.32 कोटी रुपये
• तृतीयपंथीयांसाठी अर्थ सहाय्य 2 कोटी रुपये
• ज्येष्ठ नागरिक : 11 कोटी रुपये
• महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी रुपये


मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणांसाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. 


शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना आणि प्रकल्प


• बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार


• बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यांवर अधिक भर दिला जाणार


• मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती


• दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार


• बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित आणि विज्ञान केंद्र उभारली जाणार 


मुंबईतील पाऊस आणि पूर अलर्ट प्रणाली


• मुंबईतील 28 ठिकाणांवरील पर्जन्यमानाची अचूक मोजमापाची माहिती पावसाळ्यात दर 15 मिनिटाला पालिकेकडून दिली जाते. त्यात आता आणखी 60 ठिकाणींवरुन माहिती दिली जाणार आहे. सोबतच पूर इशारा प्रणालीची क्षमता वाढविण्याची देखील शिफारस. अर्थसंकल्पात 2.64 कोटी रुपयांची तरतूद


नवा प्रकल्प नाही 


मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवा प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. 


इक्बाल सिंह चहल काय म्हणाले? 


- यावर्षी अर्थसंकल्पासाठी भरीव तरतूद, 50 हजारांच्यावर अर्थसंकल्प 
- पायाभूत सोयीसुविधांवर देखील मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. 
- 52 टक्के विकासावर खर्च केला जाणार तर 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च केला जाणार 
- पहिल्यांदाच पायाभूत सुविधांकरीता 50 टक्क्यांच्यावर निधी खर्च होणार
- महसुलात मोठी वाढ होते आहे 
- कोविडमुळे मालमत्ता करांच्या महसूलात घट 
- मुंबईतल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणार 
- फूटपाथसाठी नवी धोरण 
- ज्यात मुंबईतील 9 मीटरहून अधिक रस्ता असल्यास दोन्ही बाजूने फूटपाथ असणार
- पुढील 2-3 वर्षात मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण होणार 
- यावर्षी आरोग्यासाठी 6 हजार 300 कोटी रुपयांचा निधी 
- आरोग्य, पर्यावरण, शिक्षणसाठी भरीव निधी दिला आहे 
- बाळासाहेब ठाकरे आपलं क्लिनिकची संख्या 208 पर्यंत जाणार 31 मार्चपर्यंत
- 18 रुग्णालयांची उभारणी देखील या निधीमधून केली जाणार