Mumbai News Update : मुंबईकरांसाठी अतीशय महत्वाची बातमी आहे. 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतची माहिती दिली आहे.
ठाणे येथील कोपरी पुलाजवळ ठाणे महानगरपलिकेतर्फे नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2,345 मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई 2’ जलवाहिनीला हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गळती दुरुस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही परिसरात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद केला जाईल. यामुळे शहराच्या काही भागात कमी दाब निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, यापूर्वी 2 आणि 3 मार्च रोजी देखील मुंबईतील काही भागात पाणीकपात करण्यात आली होती. यामध्ये भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर (पश्चिम), पवई, लाल बहादूर शास्त्री मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर येथे पाणी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता 9 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 टक्के पाणी कपात होणार आहे.
पूर्व उपनगरे आणि शहर विभागात पाणी कपात होणार
1) पूर्व उपनगरे
टी विभागः मुलूंड (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग
एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.
एन विभागः विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग
एम/पूर्व विभागः संपूर्ण विभाग
एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग
2) शहर विभाग
ए विभागः बीपीटी व नौदल परिसर
बी विभागः संपूर्ण विभाग
ई विभागः संपूर्ण विभाग
एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग
एफ/उत्तर विभागः संपूर्ण
महत्वाच्या बातम्या