Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे (Runway re carpeting) काम पूर्ण झालं आहे. या काळात विमानतळाच्या सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण झाले आहे. रिकार्पेटिंगच्या कामामुळं धावपट्टीची कार्यक्षमता वाढली असून सुरक्षा देखील सुधारल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 


नऊ डिसेंबर 2022 रोजी सुरु केलं होतं काम 


विमानतळावरील  धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांसह 200 कर्मचारी दररोज मेहनत घेत होते. अंतिम मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यासाठी धावपट्टी दररोज 12 तास बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. 2210 मीटर लांबी आणि 75 मीटर रुंदीच्या धावपट्टीवर 72500 टन डांबर टाकले आहे. मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक भागधारकांच्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना राबवली होती. नऊ डिसेंबर 2022 रोजी सुरु झालेले रीकार्पेटिंग काम 10 जून 2023 रोजी पूर्ण झाला आहे. लँडिंग आणि टेक-ऑफ दरम्यान सतत आणि सुरक्षित विमान वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम करणे गरजेचे होते. दिवसभरात या विमानतळावरून 900 पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण होते. पुढील 10 वर्ष या विमानतळाची धावपट्टी मजबून करण्यात यश आलं आहे. 




मुंबई विमानतळ माहिती 


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) सुमारे 1850 एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे. हे विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे. यामुळं यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. हे विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्‍ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे. देशांतर्गत टप्पा असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि काही राष्ट्रीय उड्डाणे सुद्धा याच टर्मिनलवरून ये-जा करतात.एयर इंडिया आणि विस्तारा एयरलाईन्स यांची सर्व राष्ट्रीय उड्डाणे आणि इतरांची काही राष्ट्रीय उड्डाणे यांचा त्यात समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget : पुरंदरसाठी विमानतळ, ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो अन् मुंबईचा सर्वांगिण विकास; पायाभूत सुविधांसाठी देवेंद्र फडणवीसांनी केल्या 'या' घोषणा