Maharashtra Mumbai News : मुंबईघाटकोपरमधील (Ghatkopar Mall) मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किड्स झोनमध्ये (Kids Zone) खेळत असताना तोल जाऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या नीलयोगस मॉलमध्ये (Neelyog Square Mall Ghatkopar) ही दुर्घटना घडली आहे. 


टिळकनगर परिसरात राहणारी दालिशा करण वर्मा आई-वडिलांसोबत रविवारी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती. तिथे किड्स झोनमध्ये घसरगुंडीचा आनंद लुटत असताना तोल जाऊन ती खाली पडली. दालिशाला डोक्याला मार लागल्यानं ती बेशुद्ध पडली. तिच्य डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं आढळल्यानं दालिशाला मुलुंडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आलं. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांची दालिशा आपल्या आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील निलियोग मॉल येथे गेली होती. तिथे तिच्या आई वडिलांनी तिला कीडझोनमध्ये खेळण्यासाठी नेलं. दालिशा खेळता खेळता घसरगुंडीवरुन पडली आणि ती बेशुद्ध पडली. दालिशा डोक्यावर पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई-वडिलांनी तिला उपचाराकरता नाहूरमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी दालिशाला तपासलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दालिशाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 


दरम्यान, दालिशाच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यांना खेळायला कुठेही घेऊन जात असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


कोल्हापुरात लव्ह जिहाद? 18 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता