मुंबई: मुंबई विमान तळावर प्रवासी खोळंबल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 6.30 चे विमान अद्याप टेक ऑफ झाले नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईतून इस्तानबुलला जाणारे सकाळी 6.30 चे विमान थेट रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांच्या माहितीनुसार, मुंबई टू इस्तानबुल सकाळी 6.55 ला विमान टेक ऑफ होणार होते. सकाळी 8.20 पर्यंत टेक ऑफ होईल असे आधी सांगण्यात आले. त्यानंतर साडे नऊ वाजता बोर्ड केले आणि तिथे बसवून ठेवले. तब्बल तास दिड तास बसविल्यानंतर पुन्हा एग्जिट घ्या असे सांगण्यात आले. साडे बाराला आम्ही पुन्हा विमानात बोर्ड केले, अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे. 


इस्तानबुलचे वातावरण थंड असल्याने प्रवाशांनी थंडीचे कपडे घालून विमानात बोर्ड केले होते, विमानात प्रवाशांना दीड तास बिना एयर कंडीशन बसवलं. त्यानंतर आता प्रवाशांना सांगण्यात आले आहे की, हे विमान रद्द करण्यात येत आहे. हा प्रवास रद्द का याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची एयरपोर्ट मॅनेजर आणि इंडिगोच्या मॅनेजर ला संपर्क साधण्याच प्रयत्न पण अद्याप काही उत्तर मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. इंडिगोचा मुंबई टू इस्तानबुल प्रवास रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या विमानात 100 प्रवासी असल्याची माहिती आहे, तर विद्यार्थांची संख्या ही मोठी आहे.