Mumbai Crime : कुर्ल्यातून (Kurla Crime News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रॉपर्टीच्या वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. काझम हुसेन मिर्झा बेग असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील 10 ते 15 वर्षांपासून आरोपी आणि मयत काझम हुसेन मिर्झा बेग यांच्यात  प्रॉपर्टीवरून वाद सुरु होते. याच वादातून राग विकोपाला गेल्याने तीन जणांनी काझम हुसेन मिर्झा बेग यांची गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी कुर्ला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सफदर हुसेन सय्यद, शबरेज हुसेन सय्यद, वासीफ हुसेन सय्यद, अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे कुर्ल्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात पोलीस आरोपपत्र दाखल करणार

दरम्यान, बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात लवकरच गुन्हे शाखेचे पोलीस आरोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणी एकूण 26 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. यात शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई या तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. या हत्येमागील कारणाबाबत मुंबई गुन्हे शाखेला अद्याप काहीही ठोस सापडले नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र मुंबई क्राईम ब्रँचने एसआरए वादाच्या ही हत्या झाली आहे का ? याचा तपास केला असता पोलिसांना एसआरए प्रकल्पामुळे ही हत्या झाली असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत.  बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात सलमान खान आणि बाबा सिद्धीकी यांच्यातील जवळीकता यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील अटक केलेले आरोपी हे दिलेल्या टास्कनुसार काम करत होते. त्यामुळे हत्येमागील मूळ कारणाबाबत त्यांनाही फारशी माहिती नसल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तरला अटक होईपर्यंत या हत्येमागचे खरे कारण स्पष्ट होणार नसल्याचे मत तपास अधिकार्‍यांचे आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Parbhani Crime : तिसरीही मुलगी झाल्याच्या संताप, क्रूरतेने पतीने पत्नीला संपवलं; काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा; जरांगे, आव्हाड ते सोनावणे, संभाजीराजेंपर्यंत...; कोण कोण सहभागी होणार?