Mumbai News : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) मागील 25 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम (MLA Amit Satam) यांनी केला. विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेतील तीन लाख कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावरुन सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी एरंगळ बीचवर बनलेल्या अवैध स्टूडिओचा मुद्दाही उपस्थित करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.


अमित साटम यांनी विधानसभेत कलम 293 अंतर्गत मुंबई शहरावर चर्चा करताना म्हटलं की, "मुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. तीन लाख कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. मुंबई महापालिकेत आयुक्तांच्या रुपात सचिन वाझे बसला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट आयुक्त आहे. मागील 25 वर्षात बीएमसीमधील आर्थिक गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मी करतो. 3 लाख कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार कोळसा तसं 2G घोटाळ्यापेक्षा फार मोठा आहे. तुम्ही बीएमसीशी संबंधित कोणतंही नाव घ्या आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार निश्चित दिसेल. उदाहरणार्थ, रस्ते, शाळेचं साहित्य, उद्यान, भंगार, प्राणीसंग्रहालय, प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणणं. कोविड काळातही 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला होता."


एरंगळ बीचवरील स्टूडिओला कोणी परवानगी दिली?
"मालाडमधील एरंगळ बीचवर बनलेल्या अवैध स्टूडिओला कोणी परवानगी दिली, असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला. या शूटिंग स्टूडिओच्या बांधकामात CRZ 1 आणि  CRZ 2 चं संपूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं. पण MCZMA ने म्हटलं आहे की नियम 2019 अंतर्गत या स्टूडिओला बीएमसीने परवानगी दिली होती. नियम केवळ गेव्याला लागून होतात, मुंबईला नाही.


'कथित सीसीटीव्ही कॅमेरा घोटाळ्याची चौकशी व्हावी' 
भाजप आमदार अमित साटम यांनी मुंबईमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, 2008 मध्ये मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरा लावणार याची घोषणा झाली, मात्र कॅमेरा लागले नव्हते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी कॅमेरा लावले. या कॅमेराचे कनेक्शन पोलिसांना दिले होते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने महापालिका अधिकाऱ्याला पत्र दिलं की ही कंपनीने मोफत कॅमेरा लावते, त्यांना काम द्या. कॅमेरे मोफत लावले मात्र त्या 1200 पोल वर इंटरनेटचे कनेक्शन लावलं. उद्या यांचा उपयोग देशविघातक कृत्ये करण्यासाठी झाला तर जबाबदार कोण. मागील सरकारमधील कथित सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या घोटाळाची चौकशी व्हायला हवी. 


Amit satam on BMC : मुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा घोटाळा, अमित साटम यांचा आरोप



संबंधित बातम्या


मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचार; भाजपचा आरोप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन 


Congress On BMC Corruption : पाच वर्षात BMC चा रस्त्यांवर 12 हजार कोटींचा खर्च; काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी