Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे. सकाळी कामकाज सुरु होण्याची काही वेळापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं


राड्याची सुरुवात नेमकी कशी अन् शेवट कसा झाला?


सकाळी हाऊस सुरु होण्यापूर्वी कथित कोविड घोटाळ्याविरोधात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरु केलं


यावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यावेळी देखील ते काही काळ  तिथे थांबले आणि बॅनरवरचा मजकूर वाचला.


या गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.


काही वेळानं विरोधी पक्षातील आमदार आंदोलन करण्यासाठी पायऱ्यांकडे आले


सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. 


एकमेकांच्या अंगावर जाताना काही आमदारांनी शिविगाळ केल्याचा आवाज देखील व्हिडीओमध्ये ऐकू येतोय.


विधानभवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांच्या अंगावर गेले, धक्काबुक्की केली


यावेळी पायऱ्यांसमोर जवळपास 15 ते 20 मिनिटं प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला


यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह काही आमदारांनी मध्यस्थी केली. 


राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली


सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे.


 मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. 


कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा इशारा


त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाहीत, असं भरत गोगावले म्हणाले.


कुणीही कुणाला धमकावलेलं नाही, विरोधकांप्रमाणे आम्हालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जो कुणी अंगावर येईल, त्याला शिंगावर घेतलं जाईलच, असं आमदार दिलीप लांडे म्हणाले. 


विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधी गटातील आमदारांना वेगळीकडे जाण्याच्या सूचना केल्या.


अमोल मिटकरी प्रसिद्धीसाठी माकड चाळे करत असतात असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला 


इतर महत्वाच्या बातम्या


राज्यात धर्मांतराचं रॅकेट, धर्म आणि जातीनुसार त्यांच रेटकार्ड, नितेश राणे यांचा गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले...


Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर