Mumbai Municipal Corporation Budget 2023-24 : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा (BMC)  2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प (BMC Budget)  शनिवारी, चार फेब्रुवारी रोजी  सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा बजेट प्रशासकाकडून सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत. 


बीएमसी अर्थसंकल्प सादर करण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिका अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. बीएमसी कडून अर्थसंकल्प सादर करत असताना मिळालेल्या नागरिकांचे , राजकीय पक्षांचे अभिप्राय आणि सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 


प्रशासक म्हणून आयुक्तांकडून यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पूर्ण वेळ घेऊन यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.  मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी काय पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीएमसी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्यावर भर दिला जाणार असल्याचं समजतेय. 


यंदा सन 2023- 24चा अर्थसंकल्प4 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचे प्रशासक व आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल मांडणार  आहेत. आयुक्त हेच या अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकच अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार आहे. त्यात यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सादर होणार असल्याने आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतूदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्यक्षात मुंबईकरांच्या पदरी काय पडणार हे 4 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. 


गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर 1800 कोटींची वाढ करण्यात आल्याने एकूण  6624.41 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही यात वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या 45949.21 कोटींच्या अर्थसंकल्पात यावर्षीही सुमारे साडेचार हजार कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एकूण बजेटपैकी तब्बल 15 टक्के तरतूद आरोग्यावर करण्यात आली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही विशेष तरतूद व नव्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक डोळ्यासमोर कोणत्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा होते हे बघावं लागणार आहे. 


आणखी वाचा :
दिल्ली, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबईतही बसवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बीएमसीला सूचना