Mumbai: मीरा रोड पूर्वेतील म्हाडा कॉलीनीतील रहिवाशांनी आज पालिकेच्या एसटीपी प्लांटच्या विरोधात आंदोलन केलं आहे. येथील एसटीपी प्लांटच्या दुर्गंधीमुळे  नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 2019 ला या एसटीपी प्लांटमध्ये काम करायला आलेल्या तीन मजूरांचा विषारी वायूमुळे मृत्यू देखील झाला होता. आयुक्तांच्या आश्वासनानंतर रहिवाशांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड पूर्व येथील शांती गार्डन संकुलात असलेल्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशी संकूलात मीरा भाईंदर महानगरपालिकेनं 'सांडपाणी केंद्र-6'  हा एसटीपी प्लांट बांधला आहे. या प्लांटच्या शेजारी 25 सोसायटी आहेत. त्याया जवळपास सात हजार नागरीक राहतात. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या एसटीपी प्लांट बंद होतं. पालिकेनं तो आता पुन्हा सुरु केला आहे.  त्या प्लांटमधून आता प्रचंड दुर्गंधी येत आहे.  


पालिकेच्या या एसटीपी प्लांटमध्ये सोसायटीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन, पाणी शुद्धबनवलं जातं. मात्र ही प्रक्रिया करत असताना या प्लांट मधून, दुर्गंधी आणि विषारी वायू सुटत असल्याने वयोवृद्ध, लहान मुलांसह सर्व रहिवाशांच आरोग्य धोक्यात आले आहे. 16 जानेवारी 2019 मध्ये या प्लांट मध्ये काम करायला आलेल्या तीन मजूरांचा विषारी वायूमुळे मृ्त्य देखील झाला आहे.  पालिका आणि स्थानिक नेत्यांकडे अनेक तक्रारी करूनही कुणीही ऐकायला तयार नसल्याने आज येथील सोसायट्यांनी पालिकेविरोधात आंदोलनाचा बडगा उचळला होता. अखेर पालिका आयुक्तांनी दुर्गंधीवर येत्या 15 दिवसात योग्य उपाययोजना योजल्या जातील, असं आशवासन दिलं आहे.


महत्वाच्या बातम्या


शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत


Sharad Pawar : कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार


Raju Shetti : शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं : राजू शेट्टी