Mumbai : मुंबई मेट्रो 1 ची वाहतूक विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे. मेट्रो सेवेत आलेला तांत्रिक बिघाड दूर झाल्याने आता मेट्रो सेवा सुरुळीत सुरु झाली आहे. या संदर्भात मेट्रोने बिघाड दूर झाल्याचं सांगितलं आहे. साकीनाका स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे मेट्रोची 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरु होती. मुंबई मेट्रो 1 ची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानची मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे प्रवाशांचा काही वेळासाठी खोळंबा झाला होता. सुमारे 25 ते 30 मिनिटे मेट्रो सेवा पूर्णपणे ठप्प होती.


मेट्रोने ट्विट करत दिली माहिती


मेट्रो सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाल्यानंतर आता मेट्रो सेवा पूर्ववत झाली आहे. मेट्रोने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. मेट्रोने ट्विट करत म्हटलं आहे की, 'मेट्रोची वाहतूक पुन्हा सुरू झाली असून गाड्या वेळापत्रकानुसार सुरु धावतील. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. #HaveANiceDay'






मेट्रोने याआधी ट्विट करत मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याचं सांगितलं होतं


दरम्यान, मेट्रोने याआधी ट्विट करत मेट्रोच्या झालेल्या खोळंब्याबाबत सांगितलं होत. सेवा विस्कळीत झाल्याची माहिती देत मेट्रोने लवकरच सेवा पूर्ववत करण्याचं सांगितलं होते. मेट्रोने ट्विट करत म्हटले होते की, 'तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो 1 ची घाटकोपरहून वर्सोव्याकडे जाणारी एक ट्रेन विमानतळ रस्ता (Airport Road) मेट्रो स्वानकावर अडकली होती. मेट्रोची सेवा लवकरच पूर्ववत होईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.' यानंतर आता सेवा पूर्ववत झाली आहे. 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha