मुंबई : येत्या 2024 मुंबईकरांना (Mumbai) नववर्षाची विशेष भेट मिळणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. कारण मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 (Metro 3) च्या फेज 1 चं उद्घाटन येत्या 2024 च्या सुरुवातीलाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मेट्रो 3 च्या एकूण 37 स्थानकांपैकी फेज 1 मधील अंधेरी - एमआयडीसी मेट्रोस्थानकाचं काम जवळजवळ 100 टक्के पूर्ण झालंय आहे. त्यामुळे, लवकरच मुंबईकरांना नव्या वर्षात नव्या मेट्रोनं प्रवास करता येणार आहे.


मागील काही वर्षांपासून कुलाबा ते वांद्रे या मेट्रोच्या मार्गिकेचं भूमिगत काम सुरु आहे. त्यातच आता या मार्गिकेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याचं सांगण्यात येतय. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा येत्या 2024 मध्ये तरी संपणार का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. 


मुंबईकरांची मेट्रो कशी असणार?


मुंबईकरांनी मेट्रो ही भूमिगत असणार आहे. ही मेट्रो प्रायोगिक चाचणीत 65 किमी प्रतितास वेगानं धावणार आहे. सध्या या मेट्रोचा 5 ते 10 किमीचा ट्रायलरन करण्यात येतोय. दरम्यान मेट्रोची क्षमता ही 100 किमी प्रतितास प्रवास धावण्याची आहे. ही संपूर्ण मेट्रो भारतीय बनावटीची असून आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे ही मेट्रो बनवण्यात आलीये. मुंबईत मेट्रो 3 च्या सध्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो  ड्रायव्हरलेस असणार आहे. 


मेट्रोच्या स्थानकांचं जवळपास 100 टक्के काम पूर्ण झालंय. मेट्रोत प्रवेशाकरता फलाटावरच फुल स्क्रीन डोअर असणार आहे. रुळांवरचे अपघात किंवा आत्महत्येची 0 टक्के शक्यता यामध्ये असणार आहे. तसेच ही स्थानकं इंडिकेटर, एक्सलेटर,सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांनी अद्यायावत असतील. मेट्रोच्या फलाटावर लिफ्टची सोय करण्यात आलीये. दिव्यांगांकरता विशेष शौचालय, बेबी डायपर चेंजींग रुम मोफत इंटरनेट,  वायफाय सुविधा  देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


मेट्रो 3 ची वैशिष्ट्ये


या मेट्रो 3 मुळे  साडेचारलाख वाहनफेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. तसेच 2031 पर्यंत ही संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामुळे अडीचलाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे 2031 पर्यंत  साडेतीन लाख इंधनाची बचत होण्यात मदत होईल. तसेच दरवर्षी 10 हजार मेट्रीक टन कर्बवायुंचं प्रमाण कमी होईल. अडीचलाख टन प्रदुषित वायू प्रतीवर्षी कमी होण्यास मदत होईल. 


हेही वाचा : 


Mumbai Crime: "एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू"; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल