CM Uddhav Thackeray Speech points : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :


> आज चार कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यापैकी राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांच्या कार्यक्रमात ऑफलाइन आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्याच्या कार्यक्रमांना ऑफलाइन हजेरी लावली. पण आमच्या लाइन सरळ आहे, त्यात कोणतीही लाइन वाकडी नाही. 


> राजकारणात एक नवीन साथ आली आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही. या व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. एकतर इतरांनी केलं नाही, जे केलं ते आम्हीच केलं आणि इतरांनी नवीन केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत असल्याचे दिसते. 


> राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. 


> पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचे सरकारचे धोरण; याआधी मुंबईकरांनी रात्रीच्या वेळी झाडे कापली जात असल्याचे पाहिले आहे. 


> मुंबईकडून सर्वाधिक कर दिला जातो. मात्र, त्याबदल्यात मुंबईला काय मिळतं? 


> मुंबई मेट्रोसाठी कांजूरची ओसाड जमीन का दिली जात नाही, मुंबईच्या पम्पिंग स्टेशनसाठी जमिनीची मागणी करूनही ती जमीन दिली जात नाही. धारावीच्या विकासासाठी रेल्वेची जमीन दिली जात नाही.


> मुंबई वाढत आहे, बदलती मुंबई पाहिली आहे. नागरिकांना मुंबईत अनेक सुविधा दिल्या आहेत, काळानुसार शहर बदलत असताना आणखी किती सुविधा द्यायचा हा प्रश्न उभा राहतो.


> मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा फायदा राज्याला किती होईल असा प्रश्न उपस्थित करत मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर राज्याच्या विकासात हातभार लागला असता.


> मुंबई मेट्रोच्या कामाचे श्रेय सर्व मुंबईकरांना दिले पाहिजे. मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी, विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध. 


> महागाई, लोकांच्या प्रश्नावरील लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.