मेट्रो 3 हा कुलाबा वांद्रे सिप्झ या मार्गावरील संपूर्ण भूयारी मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पात भूयारीकरणासाठी अजस्त्र टिबीएम मशिनचा वापर केला जातोय. टिबीएम मशिनच्या सहाय्यानं एकूण 7 टप्प्यावरचं 100% भूयारीकरण पूर्ण झालं आहे. पॅकेज 7 मध्ये मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ ही स्थानके येतात.
आरेतील कारशेडला स्थगिती -
मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी असल्याचे फडणवीस म्हणाले.
स्थगितीनंतरही आरेमधील कारशेडचं काम सुरुच -
आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनं स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे अजूनही आरे वसाहतीत कारशेडचं काम सुरुच आहे. कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानं मेट्रो 3 प्रकल्पावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारभाराच्या पहिल्याच दिवशी आरेतल्या कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केली. मात्र, स्थगितीच्या दुसऱ्या दिवशी मेट्रो कारशेडचं काम थांबलेलं नव्हते.
तर, वाढीव 5000 कोटींचा खर्च येणार
मेट्रो 3 ही मुंबईतली कुलाबा-वांद्रे-सिप्झ अशी संपूर्ण भूयारी मेट्रो आहे. मेट्रो 3 चं आरेतील कारशेडचं काम थांबवलं तर दुसऱ्या जागेवर कारशेडचं काम नव्यानं सुरु करण्यासाठी वाढीव 5000 कोटींचा खर्च येणार आहे. आरे कारशेडसाठी मुंबईतील पर्यायी जागांबाबत पुन्हा वाद होण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा -
राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतात, मात्र बहुउद्देशीय प्रकल्प राबवताना आधी लोकांचा विचार करा - हायकोर्ट
मेट्रो प्रकल्प केवळ वृक्षतोडीसाठी आखले जातात असा झालेला समज चुकीचा : हायकोर्ट
CM Uddhav Thackeray | मेट्रो, समृद्धीसह कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती नाही : उद्धव ठाकरे | ABP Majha