Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत सीप्झ-कुलाबा यादरम्यान मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.  सीप्झ ते कुलाबा यादरम्यान असणाऱ्या 26 स्टेशनपैकी 21 स्थानकाचं काम 90 टक्के पूर्ण झालं आहे. एकाचवेळी अनेक विभागाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानकाच्या बांधकामासह इतर उपकरणे लावण्याचे काम वेगाने सुरु आहे. 18 स्थानकात उपकरणे लावण्याचे काम 50 टक्के पूर्ण झालंय. 


विधानभवन स्टेशनचे काम 93 टक्के पूर्ण झालंय. तर एमआयडीसी स्टेशनचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे.  मार्च 2021 पासून ट्रॅक टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम 56 टक्के पूर्ण झाले आहे.  33.5 किमी लांबीच्या मार्गिकावर अप आणि डाऊन मार्ग मिळून  66.07 किमी. ट्रॅक बसवण्यात येणार आहे. या पूर्ण मार्गावर 10745 मॅट्रिक टन ट्र्रॅकचा वापर होणार आहे. एमएमआरसीने आरेतील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. 


मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच एमएसआरसीने आरेतील कारशेड लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारशेड निर्मितीचे काम जवळपास 53.8 टक्के पूर्ण झाले आहे. निर्धारित वेळेत मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी एमएमआरसीने पहिल्या टप्प्यात मेट्रो मार्गिका आणि स्टेशन निर्मितीसह उपकरणाचे काम 85.2 टक्के काम पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. डिसेंबर 2023 मध्ये सीप्झ ते कुलाबा यादरम्यान मेट्रो सुरु करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.  कारशेड निर्मितीला स्थगिती दिल्यामुळे अडीच वर्षांपासून निर्मितीचे काम थकले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा कारशेड निर्मितीला वेग आला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कारशेड निर्मितीचे काम पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे एमएमआरसीएलने सीप्झ ते वांद्रे यादरम्यान 9 स्टेशनदरम्यान मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 


कारशेडमध्ये ट्र्रॅक आणि उपकरणं याचं काम वेगाने सुरु आहे. सीप्झ ते वांद्रे वांद्रे यादरम्यान नऊ स्थानकावरील काम वेगाने सुरु आहे. एप्रिल 2023 पर्यंत ही स्थानके पूर्णपणे तयार होतील. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकावर आतापर्यंत मेट्रो चाचणी यशस्वी झाली आहे. यादरम्यान 10 किमीपर्यंत मेट्रो धावली असून सर्व सुरक्षा तपासण्यात आली आहे. मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का? याबाबत पडताळणी करण्यात आली.  त्याशिवाय, मध्यम आणि हाय वोल्टेजवर मेट्रोची चाचणी करण्यात आली. तसेच मेट्रोच्या ब्रेकची क्षमता, एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी झाली. 


कोणत्या स्टेशनचं काम किती पूर्ण ?


कफ परडे 95 टक्के
विधानभवन 93.5 टक्के
चर्चगेट 92.7 टक्के
हुतात्मा चौक 89 टक्के
सीएसएमटी 90.7 टक्के
काळबादेवी  77.2 टक्के
गिरगाव 62.9 टक्के
ग्रँट रोड 78.2 टक्के
मुंबई सेंट्रल 87.2 टक्के
महालक्ष्मी 86.6 टक्के
सायन्स म्युजियम 87.3 टक्के
आचार्य अत्रे चौक 85.4 टक्के
वरळी 86.6 टक्के
सिद्धिविनायक 94.9 टक्के
दादर 90 टक्के
शीतला देवी 90 टक्के
धारावी 89.2 टक्के
बीकेसी 90.3 टक्के
विद्यानगरी 91.4 टक्के
सांताक्रुज 87.6 टक्के
सीएसएमआयए (टी1) 89.8 टक्के
सहार रोड 89.5 टक्के
सीएसएमआयए (टी2) 90.9 टक्के
मरोल नाका 93.7 टक्के
एमआयडीसी 96.6 टक्के
सीप्झ 96.6 टक्के


आणखी वाचा ;
मेट्रो 3 कारशेडच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर, वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टानं निकाली काढली