मुंबई : घाटकोपर (Ghatkoper) ते वर्सोवा (Versova) या मुंबई मेट्रो1 (Mumbai Metro) च्या तांत्रिक कारणामुळे मेट्रोची सेवा ठप्प झाली होती. असल्फा (Aasalfa) ते जागृती नगर (Jagruti Nagar) या स्थानकादरम्यान मेट्रो बंद पडली होती. मेट्रोची दारं बंद होत नसल्यामुळे मेट्रोचा खोळंबा झाला. त्यामुळे मुंबई मेट्रो ही जवळपास 20 ते 25 मिनिटं उशीरा धावत असल्याचं चित्र आहे. सध्याही मेट्रो ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरुन सुरु आहे. परंतु तरीही मेट्रोची सेवा ही उशीराने आणि संथ गतीने सुरु आहे. 


आज दिवाळीनिमित्त बरीच लोकं घराबाहेर पडली आहेत. त्यातच काही नोकरदार वर्ग देखील परतीच्या प्रवासाला लागला होता. त्यातच मेट्रोमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकलचं देखील वेळापत्रक लोकांचं चुकलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी संताप व्यक्त केल्याचं चित्र होतं. दरम्यान नेहमी लोकलसाठी करावा लागणारा खोळंबा हा आज मुंबईकरांना मेट्रोसाठी करावा लागला. 


मेट्रो उशीरापर्यंत सुरु


दरम्यान सणासुदीच्या काळात मेट्रो उशीरापर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं घराबाहेर पडली होती. पंरतु मेट्रोचा खोळंबा झाल्याने ऐन सणाच्या दिवशी लोकांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याचं चित्र आहे. त्यातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांना घरी जाण्याची घाई होती. पण मेट्रोच्या बिघाडामुळे बऱ्याच गोष्टी लांबल्या. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देखील लोकांना नव्हती आणि ती प्रशासनाकडून देखील देण्यात आली नसल्याचं प्रवाश्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांमध्ये रोष पाहावयास मिळाला. 


नियोजित लोकलही चुकली 


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे लोकल सेवा सुरुळीत चालू आहे. पण मेट्रोचा खोळंबा झाल्याने लोकलाही आता तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच मेट्रोमुळे प्रवाश्यांचा काही नियोजित लोकल देखील चुकल्या. त्यामुळे डोंबिवली, कल्याणला राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे ही मेट्रोसेवा कधीपर्यंत सुरळीत होणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. तसेच काही मेट्रो या 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरुन सुरु करण्यात आल्याने पुन्हा प्रवाश्यांची देखील गैरसोय होत असल्याचं चित्र सध्या आहे. 


हेही वाचा : 


Mumbai Metro : मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वरील शेवटच्या ट्रेनच्या वेळेत बदल; शनिवारपासून वेळेत बदल होणार