Mumbai Local Mega Block :  मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे.  रविवारी, 18 सप्टेंबर रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. त्यामुळे विकेंडला लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...


हार्बर मार्गावर आणि पश्चिम मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही. ट्रान्सहार्बर मार्गावर आणि मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर कोणत्या वेळेत मेगाब्लॉक आहे.. याबाबतची माहिती जाणून घ्या...
  
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील.   


घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.


ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.