मुंबई : गस्ती दरम्यान एका सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला विष्णू नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 11 दुचाकी या चोरट्याने चोरल्या होत्या. या सर्व दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोहम्मद इसाक युनूस खान असे या चोरट्याचे नाव आहे. इसाक हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथे गेल्या काही दिवसांपासून महागड्या दुचाकी व सायकल चोरीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. रात्रीच्या सुमारास या पथकाची पश्चिम परिसरात गस्त सुरू असताना एक तरुण संशयास्पदरित्या सायकलवर फिरताना आढळून आला. पोलिसांनी या तरुणालाकडे चौकळी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्याच्याकडे असलेली सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सायकलसह 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
इलेक्ट्रिकल दुचाकींना लक्ष्य
पोलिसांनी इसान याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तो इलेक्ट्रिक दुचाकींची चोरी करत असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या गाड्या विकण्यासाठी त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. मोहम्मद विरोधात विष्णुनगर,रामनगर, टिळक नगर, मानपाडा या चारही पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून विष्णू पोलिस ठाण्यातील तीन, रामनगर पोलिस ठाण्यातील पाच, टिळक नगर पोलिस ठाण्यातील एक आणि मानपाडा पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मास्टर कीने करायचा चोरी
इसान हा मास्टर कीच्या मदतीने दुचाकींची चोरी करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून त्याने चोरलेल्या तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने अजून किती ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत? याचा तपास विष्णू नगर पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या