मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) गजबजलेल्या भागापैकी एक असलेल्या माझगाव परिसरात ( Mazgaon इगीा) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 3 वाजतच्या सुमारास झालेल्या गोळीबारात सुदैवाने जखमी झाले नाही. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीनच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. दहशत पसवण्यासाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून एक गोळी झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोळीबारादरम्यान गोळी टाळण्यासाठी धावत असलेल्या व्यक्तीला दुखापत झाली. त्याला गोळी लागली नसून धावताना दगड लागल्याने दुखापत झाली. जखमी व्यक्तीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सुदैवाने या गोळीबारात जखमी नाही
माझगाव परिसर हा गजबजलेल्या भागांपैकी आहे. येथे कायमच वर्दळ असते. शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहे. सुदैवाने या गोळीबारात जखमी झाले नाही.