Mumbai Mayor Kishori Pednekar : शिवसेनचे यशवंत जाधव हे भीमपुत्र असून ते असल्या कारवाईला घाबरणार नसून ते यंत्रणेच्या गैरप्रकाराला भिडतील, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. शिवसेना नगरसेवक आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांचे निवासस्थान  असलेल्या परिसराला भेट दिली.


आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. या छाप्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांच्या निवासस्थान परिसरात भेट दिली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करण्यासाठी मी याठिकाणी आले आहे. शिवसैनिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासाठी आले असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची सत्ता नाही तिथे सर्वांना त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना आम्ही घाबरून जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


यंत्रणांचा गैरवापर मुंबईकर पाहत आहेत


भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. यंत्रणांकडून होणारा गैरवापर हा मुंबईकर नागरीक पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप नेत्यांकडून मागील 20 वर्षातील महापालिकेतील प्रकरणे उकरून काढण्याची धमकी दिली आहे, ही प्रकरणे त्यांनी बाहेर काढावीच असे आव्हानच त्यांनी दिले.


किरीट सोमय्यांच्या आरोपांचे बाण


शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर आज सकाळी आयकर विभागानं (IT Raid) छापा टाकला. यासंदर्भात बोलताना यशवंत जाधव मनी लॉन्ड्रिंग करतात, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यशवंत जाधव आणि कुटुंबीयांच्या ताब्यात आलेला पैसा यूएईला पाठवण्यात आल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, यासंदर्भात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिग करणारा एकच माणूस आहे, असा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: